शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
3
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
4
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
5
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
6
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
7
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
8
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
9
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
10
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
11
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
12
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
13
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
14
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
15
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
16
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
17
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
18
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
19
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
20
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मी म्हातारा झालो नाही, सरकार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही'; शरद पवारांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 15:28 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : खासदार शरद पवार यांनी आज धाराशिवमध्ये जाहीर सभा घेतली.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा जोरदार सुरू आहेत. महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मैदानात आहेत. तर महाविकास आघाडीकडून खासदार शरद पवार राज्यभर दौरे करत आहेत. शरद पवार यांनी आज धाराशिवमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुतीवर निशाणा साधला आणि राज्यातील सत्ता बदलणार असल्याचा निर्धार केला. 

मविआतील मुख्यमंत्रीपदाचा दावेदार ठरला? शरद पवारांनी थेट फॉर्म्युला सांगितला, म्हणाले...

खासदार शरद पवार यांनी आज सकाळी परांडामध्ये जाहीर सभा घेतली.  परांडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारासाठी आयोजीत केलेल्या सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी बोलताना  शरद पवार म्हणाले, काही लोकांनी आमची साथ सोडली. भाजपाच्या पंक्तीत गेले. अगोदर सांगत होते विकासासाठी गेलो, पण आता भुजबळ नावाचे मंत्री सांगत आहेत की, ईडीच्या भीतीने, मला तुरुंगात टाकले होते म्हणून आम्ही भाजपासोबत गेलो, एक प्रकारे लाचारीचे दर्शन घडले आहे. महाराष्ट्र स्वाभीमानी आहे, त्यासाठी तुमची साथ हवी आहे.

'सरकार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही'

यावेळी शरद पवार म्हणाले, ओमराजे निंबाळकर मला तुमची गोष्ट अजिबात पटली नाही. तुम्ही मला या वयातही फिरतो म्हणालात. मी काय म्हातारा झालोय का? हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही. शांत बसणार नाही, असा निर्धार खासदार शरद पवार यांनी यावेळी केला. 

परांडा विधानसभेची निवडणूक लक्षवेधी ठरत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून राहुल मोटे तर महायुतीकडून शिंदे गटाचे डॉ. तानाजी सावंत निवडणूक लढवत आहेत. दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघात संभा घेतली, तर लगेच शरद पवार यांनी सभा घेतली आहे. यामुळे या मतदारसंघाची राज्यात चर्चा सुरू आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक 2024