ईट येथे डोळ्यात मिरची पूड टाकून व्यापाऱ्यास लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 13:57 IST2019-02-23T13:56:46+5:302019-02-23T13:57:14+5:30

शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी ते सकाळी निघाले होते

Looted the trader by throwing chilli powder in the eye | ईट येथे डोळ्यात मिरची पूड टाकून व्यापाऱ्यास लुटले

ईट येथे डोळ्यात मिरची पूड टाकून व्यापाऱ्यास लुटले

ईट (जि. उस्मानाबाद) : खवा उत्पादकांसह शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी निघालेल्या व्यापाऱ्याला आडवून डोळ्यात मिरची पूड टाकून दीड लाखांची लूट केली. ही घटना शनिवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास चांदवड-घाटपिंपरी मार्गावर घडली.

सरमकुंडी येथील खवा व्यापारी गणपत सदाशिव माळवदे यांचे ईट येथे खवा संकलन केंद्र आहे. या केंद्राला खवा घालणाऱ्या व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी ते शनिवारी सकाळी घरातून निघाले होते. सरमकुंडी-चांदवड मार्गे  दुचाकीवरून (एमएच.२५/एएच.१८२८) ईटकडे जात असताना सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास अज्ञात चौघांनी दुचाकी आडवून माळवदे यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याजवळील १ लाख ५० हजार रूपये हिसकावून पोबारा केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Looted the trader by throwing chilli powder in the eye