दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमिअभिलेखचा लिपिक एसीबीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 20:01 IST2025-05-29T20:00:58+5:302025-05-29T20:01:06+5:30

वाशी उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात कारवाई

Land records clerk caught by ACB while accepting a bribe of Rs 2,000 | दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमिअभिलेखचा लिपिक एसीबीच्या जाळ्यात

दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमिअभिलेखचा लिपिक एसीबीच्या जाळ्यात

धाराशिव : शेतजमिनीची हद्द कायम करून खुणा करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना वाशी उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील लिपिक दिगंबर ढोले यास रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी लाचलुचपत विभागाने केली.

वाशी तालुक्यातील तक्रारदाराने आईच्या नावे असलेल्या गट न. ४४४ शेत जमिनीची मोजणी करण्यासाठी अर्ज केला होता. त्याप्रमाणे तक्रारदाराच्या शेतजमिनीची मोजणी ७ मे २०२५ रोजी भूमी अभिलेख कार्यालयातील लोकसेवक ढोले यांनी केली होती. त्यानंतर हद्द कायम करण्यासाठी तक्रारदाराने वेळोवेळी मागणी केली होती. मात्र, ढोले यांनी वेळोवेळी टाळाटाळ केली. मोजणीनंतर हद्द कायम खुना करण्यासाठी ढोले यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागात येऊन तक्रार दिली. यानंतर लाचलुचपत विभागाने वाशी उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली. ठरल्याप्रमाणे लोकसेवक ढोले याने शेतजमीन मोजणीच्या हद्द कायम खुना करण्यासाठी तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. आरोपीविरुद्ध कलम ७, भ्र. प्र. अधिनियम १९८८ अन्वये वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रार करण्याचे आवाहन
सापळा अधिकारी म्हणून लाचलुचपत विभागातील पोलिस निरीक्षक विकास राठोड, लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलिस अंमलदार आशिष पाटील, विशाल डोके, जाकेर काझी, चालक पो. ना. दत्तात्रय करडे यांचा समावेश आहे. नागरिकांनी लाच मागणाऱ्यांची तक्रार करण्याचे आवाहन, लाचलुचपत विभागाने केले आहे.

Web Title: Land records clerk caught by ACB while accepting a bribe of Rs 2,000