उस्मानाबाद -किरकाेळ कारणावरून चाैघांनी मिळून केलेल्या बेदम मारहाणीत एकाच्या डाव्या हाताचे हाड माेडले. ही घटना कळंब तालुक्यातील बहुला येथे घडली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांविरुद्ध २ जानेवारी राेजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तू आमच्या घराच्या पत्र्यावर लाथ का मारली, असा जाब शशिकला बिक्कड (रा. बहुला) यांनी सुषमा बिक्कड यांना विचारला. याचा राग मनात धरून सुषमा बिक्कड, पती अण्णासाहेब बिक्कड, मुलगा प्रवणी, मुलगी साेनाली यांना शिवीगाळ केली. तसेच लाेखंडी गज, दगड, काठीने बेदम मारहाण केली. एवढेच नाहीतर जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेत अण्साआहेब बिक्कड यांच्या डाव्या हाताचे हाड माेडले. याप्रकरणी कळंब पाेलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्यांविरुद्ध २ जानेवारी राेजी भादंसंचे कलम ३२६, ३२४, ५०४, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.