शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलचा मेळ लागेना, लागला तर ॲप चालेना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:37 IST

कळंब : एकतर अनेक शेतकरी मोबाईल वापरत नाहीत, वापरायचा म्हटला तर मोबाईल घ्यायची ऐपत नाही. त्यात घेतलाच तर ॲप ...

कळंब : एकतर अनेक शेतकरी मोबाईल वापरत नाहीत, वापरायचा म्हटला तर मोबाईल घ्यायची ऐपत नाही. त्यात घेतलाच तर ॲप धड चालत नाही अन् ते चालले तर चांगली रेंज मिळत नाही. यास्थितीत ई-पीक पाहणी करायची कशी, असा सवाल करत छावा संघटनेने ‘ऑफलाइन’ पाहणीची मागणी केली आहे.

कळंब तालुक्यात सध्या खरीप हंगाम बहरात आला आहे. यास्थितीत दरवर्षी १५ सप्टेंबरपर्यंत पीक पाहणी होऊन त्यांची नोंद सातबारावरील नमुना नंबर १२ वर येत असते. यंदा मात्र अशा नोंदीसाठी ‘ई पीक पाहणी’ हा हायटेक कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यात दस्तुरखुद्द शेतकऱ्यांनाच थेट आपल्या वावरातून पिकांची नोंद करावी लागणार आहे. त्यासाठी दिलेल्या १५ सप्टेंबर या अंतिम तिथीपर्यंत मोजक्याच शेतकऱ्यांनी यास प्रतिसाद दिल्याने ३० तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. असे असले तरी प्रत्यक्षात आपल्या शेतामधील उभ्या पिकात उभे राहून ऑनलाईन पिकांची माहिती व फोटो अपलोड करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. यामुळे एकीकडे गावपातळीवर महसूल विभागाचे तलाठी यासाठी शेतकऱ्यांकडे आग्रह करत असले तरी यासंबंधीच्या प्रगतीचा घोषवारा मात्र धिम्यागतीने वृद्धिंगत होत आहे. त्यास तांत्रिक अडचणीच कारणीभूत ठरत असल्याचा सूर गावोगावी कानी पडत आहे.

यासंदर्भात छावा संघटनेने तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. त्यात अनेक शेतकऱ्यांची मोबाईल घ्यायची ऐपत नाही, घेतला तर वापरता येण शक्य नाही. त्यात रेंज मिळत नसल्याची व ॲप चालत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे यंदाच्या खरीप पिकांची पाहणी ऑफलाइन करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांची भेट घेऊन हे निवेदन दिले. यावर ‘छावा’चे मराठवाडा अध्यक्ष वसुदेव पाचंगे, तालुका सरचिटणीस लक्ष्मण लोमटे, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष वैभव जाधव, संग्राम मुंडे, अभिषेक माने, विशाल शेळके, अजीत लांडगे, रवी शेळके, लक्ष्मण कोठावळे, दीपक कोठावळे, गहिनीनाथ पाटील, नवनाथ तवले, शक्ती गायकवाड नरसिंग लोमटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.