मराठा आरक्षणाचा प्रश्न दाेन दिवसांत सुटेल अशी आशा; तानाजी सावंत यांचा मोठा दावा

By बाबुराव चव्हाण | Updated: October 28, 2023 17:08 IST2023-10-28T17:08:03+5:302023-10-28T17:08:30+5:30

आराेग्यमंत्री तानाजी सावंत यांचे तुळजापुरात वक्तव्य...

Hope that the issue of Maratha reservation will be resolved in two days; Big claim of Tanaji Sawant | मराठा आरक्षणाचा प्रश्न दाेन दिवसांत सुटेल अशी आशा; तानाजी सावंत यांचा मोठा दावा

मराठा आरक्षणाचा प्रश्न दाेन दिवसांत सुटेल अशी आशा; तानाजी सावंत यांचा मोठा दावा

धाराशिव : आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. असे असतानाच शनिवारी राज्याचे आराेग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रा. डाॅ. तानाजी सावंत यांनी तुळजापुरात माेठं वक्तव्य केलं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न येत्या दाेन दिवसांत सुटेल, अशी आशा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तुळजापूर येथील महाआराेग्य शिबिरास भेट दिल्यानंतर ते माध्यमांशी बाेलत हाेते. मंत्री प्रा. डाॅ. सावंत म्हणाले, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तसेच केंद्रातील नेतेमंडळी प्रयत्न करीत आहेत. निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीच्या माध्यमातून युध्द पातळीवर पुरावे गाेळा करण्यात येताहेत. ही समिती प्रत्येक जिल्ह्यात जावून प्रशासन तसेच नागरिकांकडून पुरावे स्वीकारत आहे. एकूणच हा प्रश्न लवकरात लवकर साेडविण्याच्या अनुषंगाने शासनस्तरावर काम सुरू आहे. त्यामुळे येत्या दाेन दिवसांत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल, अशी आशा असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हाप्रमुख सुरज साळुंके आदी पदाधिकारी उपस्थित हाेते.

Web Title: Hope that the issue of Maratha reservation will be resolved in two days; Big claim of Tanaji Sawant