शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

आंदाेरा येथील कन्येने घातली कॅप्टन पदाला गवसणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:34 IST

कळंब :वडिलांनी सैन्यदलात अधिकारी व्हायचे प्रयत्न केले. मात्र यश आले नाही. मुलीने मात्र डॉक्टर असतानाही जिद्दीने सैन्यदलात प्रवे‌श मिळविला, ...

कळंब :वडिलांनी सैन्यदलात अधिकारी व्हायचे प्रयत्न केले. मात्र यश आले नाही. मुलीने मात्र डॉक्टर असतानाही जिद्दीने सैन्यदलात प्रवे‌श मिळविला, तो पण अधिकारी म्हणून. भारतीय सैन्य दलात ‘कॅप्टन’ म्हणून निवड झालेल्या आंदोरा येथील डॉ. किरण रविकांत काळे यांची ही भरारी खरोखरच प्रेरणादायी अशीच आहे.

अलीकडे प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. उद्योग असो की संशोधन अशा विविध प्रवर्गात त्यांच्या अनेक यशोगाथा समोर येत आहेत. प्रशासन, कार्पोरेट जगतामध्येही त्यांचा वावर आता नवा राहिलेला नाही. संरक्षण क्षेत्रातही यांचा उल्लेखनीय सहभाग दिसून येत आहे. तालुक्यातील आंदोरा येथील रहिवासी असलेल्या रविकांत रामभाऊ काळे यांच्या २५ वर्षीय डॉक्टर कन्येने यशाची भरारी घेत थेट भारतीय सैन्य दलात ‘कॅप्टन’ पदाला गवसणी घातली आहे.

आंदोरा येथील रविकांत रामभाऊ काळे हे कारागृह विभागात सांख्यिकी अन्वेषक म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेली त्यांची कन्या डॉ. किरण ही विविध खेळातही प्रावीण्य मिळविलेली.

हेच गुण ओळखत मावशी सुरेखा विजय दंडनाईक यांनी किरणला उस्मानाबाद येथील विद्यामाता शाळेत प्रवेश घ्यावयास लावला. तेथे अभ्यासासह नितीन जामगे या सहशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध खेळात प्रावीण्य मिळविले.

यानंतर पुढे उच्च माध्यमिक शिक्षण लातूरच्या दयानंद व शाहू महाविद्यालयात घेतलं. पुढे तेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ‘एमबीबीएस’ शिक्षण पूर्ण केले व औरंगाबाद येथे ‘पीजी‌’ची तयारी सुरू केली.

दरम्यानच्या काळात देशसेवेत सहभागी होण्याची इच्छा डॉ. किरण यांना स्वस्थ बसू देत नव्हती. यानंतर २०२० मध्ये सैन्यदलात अधिकारी पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली. यात ऑगस्टमध्ये ‘एएफएमएस’साठी चार दिवसांची मुलाखत दिली. तद्नंतर मेडिकल झालं अन् यशही मिळालं.

यात यश मिळाल्याने एक मे रोजी कॅप्टन पदाचे ऑफर लेटर प्राप्त झालं. लागलीच दुसऱ्या दिवशी खडकी पुणे येथे उपस्थिती नोंदविली. एकूणच जिद्द, परिश्रमाच्या बळावर ‘डॉक्टर’ झालेली किरण काळे यांनी आता सैन्यदलातील ‘एएमसीम’ध्ये ‘कॅप्टन’ पदाला गवसणी घातली आहे. ही य‌शोगाथा ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी अशीच आहे.

चाैकट...

वडिलांचे स्वप्न वास्तवात आणले....

डॉ. किरण रविकांत काळे यांचे आजोबा रामभाऊ काळे हे सैन्यदलात कार्यरत होते. तेथील सेवानिवृत्तीनंतर त्यांनी एसटी महामंडळात चालक म्हणून काम केले. यानंतर वडील रविकांत यांनी आपले मामा कर्नल भीमराव पवार यांच्या प्रेरणेने एनडीएच्या परीक्षा दिल्या. मात्र, प्रयत्न करूनही त्यांना सैन्यदलात अधिकारी होता आलं नाही. यानंतर ते कारागृह विभागात नियुक्त झाले. एकूणच आजोबा, वडिलांचे मामा यांची प्रेरणा घेत डॉ. किरण यांनी सैन्यदलात एक अधिकारी म्हणून प्रवेश करीत आपल्या वडिलांचे स्वप्न वास्तवात आणले आहे.

लहानपणापासून अंगी अष्टपैलूत्व...

डॉ. किरण यांच्या यशाचे आज्जी मालनबाई, आई उषा, वडील रविकांत, अनंत काळे, नमिता काळे यांच्यासह सर्व नातेवाईक, शिक्षकवृंद यांनी मोठं कौतुक केलं आहे. आंदोरा, कळंब शहर व पुणे या तीनही रहिवास असलेल्या ठिकाणी या निवडीचे स्वागत होत आहे. आपली मुलगी अष्टपैलू होती. शिक्षणासोबतच स्विमिंग, कराटे, ॲथलेटिक्स, बास्केट बॉल, थाळी व गोळा फेक, पेटिंग, नृत्य याची तिला केवळ आवडच होती असे नव्हे, तर यात नैपुण्यही मिळविले होते. यानंतर शिस्त, दे‌शप्रेम, देशसेवा याला महत्त्व असलेल्या सैन्यदलात तिचे एक अधिकारी म्हणून पाऊल पडले आहे असे वडील रविकांत काळे यांनी सांगितले.