उस्मानाबादेत नापिकी व कर्जामुळे शेतकरी दांम्पत्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 12:23 IST2018-09-04T12:22:53+5:302018-09-04T12:23:30+5:30
उस्मानाबाद जिल्ह्यातील आढाळा येथील एका शेतकरी दांम्पत्याने स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

उस्मानाबादेत नापिकी व कर्जामुळे शेतकरी दांम्पत्याची आत्महत्या
कळंब (उस्मानाबाद) : उस्मानाबाद जिल्ह्यातील आढाळा येथील एका शेतकरी दांम्पत्याने स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
कळंब तालुक्यातील आढाळा येथील शेतकरी शिवाजी अंबादास वायसे (वय ५५) व त्यांची पत्नी धोंडूबाई वायसे (वय ५०) यांची आढाळा-बहुला रस्त्यालगत शेती आहे़ या शेतीतील एका झाडास या दोघांनीही आज पहाटेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले तरी, तलाठ्यांनी केलेल्या पंचनाम्यात नापिकी व कर्जामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे. मयत शिवाजी वायसे यांच्या नावे १ हेक्टर २० आर तर धोंडूबाई वायसे यांच्या नावे १ हेक्टर ३० आर शेती आहे़ तर यावर बँक आॅफ इंडियाचे १ लाख रुपयांचे कर्ज आहे़ सततची नापिकी अन् कर्जामुळे या आत्महत्या झाल्याची चर्चा आहे़.