धाराशिव : गुन्ह्यात मदत करण्यासाठी आधी १० हजार रुपये घेऊनही पुन्हा १५ हजारांची मागणी करुन तडजोडीअंती ५ हजार रुपये स्वीकारताना तुळजापूर ठाण्यातच सहायक पोलिस उपनिरीक्षक चतुर्भुज झाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ मार्च रोजी रात्री ही कारवाई केली असून, मध्यरात्री आरोपीवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तुळजापूर पोलिस ठाण्यात सहायक उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेला श्रीनिवास आरदवाड याने तक्रारदाराविरुद्ध दाखल एका गुन्ह्यात मदतीचे आश्वासन दिले होते. यापोटी त्याने यापूर्वीच १० हजार रुपये उकळले होते. दरम्यान, यानंतरही गुन्ह्यात कलम वाढ न करण्यासाठी व दुचाकी जप्त न करण्यासाठी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी सुरु केली. तक्रारदाराने ४ मार्च रोजी सकाळी हा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक योगेश वेळापुरे यांच्याकडे कथन केला व लेखी तक्रारही दिली. यानंतर पंचास पाठवून लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. यावेळी तडजोड करीत आरोपी श्रीनिवास आरदवाड याने ५ रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
लाचेच्या प्रकाराची खात्री झाल्यानंतर लाचलुचपतच्या पथकातील पोलिस निरीक्षक बाळासाहेब नरवटे, कर्मचारी आशिष पाटील, विशाल डोके, जाकेर काझी व दत्तात्रय करडे यांनी गुरुवारी रात्री तुळजापूर पोलिस ठाण्याच्या आवारात सापळा रचला. तक्रारदाराकडून आरोपी आरदवाड याने ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यास रंगेहात ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्या फिर्यादीवरून मध्यरात्री तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आरोपीच्या घराची झडती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती.
Web Summary : A police sub-inspector in Tuljapur was caught red-handed by the Anti-Corruption Bureau accepting a bribe of ₹5,000. He had already taken ₹10,000 and demanded more money to help in a case. A case has been registered.
Web Summary : तुलजापुर पुलिस स्टेशन में एक सहायक पुलिस उपनिरीक्षक को रिश्वत लेते हुए रंगे हाथों पकड़ा गया। उसने पहले ही 10,000 रुपये लिए थे और एक मामले में मदद करने के लिए और पैसे की मांग कर रहा था। मामला दर्ज।