वाशी येथे भरधाव कार-दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 15:48 IST2018-09-13T15:37:35+5:302018-09-13T15:48:02+5:30
भरधाव कार व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवील एकाचा जागीच मृत्यू झाला.

वाशी येथे भरधाव कार-दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू
वाशी ( उस्मानाबाद) : भरधाव कार व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एकजण गंभीर जखमी आहे. ही घटना गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास औैरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील येसवंडी फाड्यानजीक घडली.
भूम तालुक्यातील घाटपिंपरी येथील सर्जेराव राऊ पवार (वय-५०) व त्यांचा मुलगा दादासाहेब सर्जेराव पवार (वय-३२) हे दोघेजण दुचाकीवरून (क्र.एमएच.२५/एएम.४२१) सरमकुंडी फाट्याकडून औरंगाबाद-सोलापूर मार्गावरून घाटपिंपरीकडे निघाले होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही दुचाकी येसवंडी फाट्यानजीक आली असता, बीडहून येणाऱ्या भरधाव कारची (एमएच.२०/डीव्ही.४०६३) समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात दुचाकीवरील सर्जेराव पवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा दादासाहेब पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. वाशी ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोनि सतीश चव्हाण हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचानामा करून त्यांनी महार्गावरील वाहतूक सुरळीत केली. निष्काळजीपणाने भरधाव वेगाने वाहन चालवून सर्जेराव पवार यांच्या मृत्युला कारणीभूत ठरल्याप्रकरणी दाखल तक्रारीवरून वाशी पोेलिस ठाण्यात कारचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर कारचालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. अधिक तपास हवालदार रणदिवे हे करीत आहेत.