काळ कोठून येईल सांगता येत नाही! अनियंत्रित भरधाव कार हॉटेलमध्ये घुसली, दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 19:24 IST2026-03-10T19:12:25+5:302026-03-10T19:24:06+5:30

या भीषण अपघातात माजी नगरसेवकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला

Dharashiv Umarga Accident: Car Tyres Burst, Vehicle Rams into Hotel Killing Ex-Corporator and Businessman on the Spot | काळ कोठून येईल सांगता येत नाही! अनियंत्रित भरधाव कार हॉटेलमध्ये घुसली, दोघांचा मृत्यू

काळ कोठून येईल सांगता येत नाही! अनियंत्रित भरधाव कार हॉटेलमध्ये घुसली, दोघांचा मृत्यू

उमरगा (जि. धाराशिव): सोलापूर-हैदराबाद महामार्गावर जकेकूर चौरस्त्याजवळ मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. महामार्गावरून भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही कार थेट रस्त्याकडेला असलेल्या हॉटेलमध्ये घुसली. या दुर्घटनेत हॉटेलबाहेर बसलेले माजी नगरसेवक बळीराम पवार आणि व्यावसायिक लाडनशहा मूर्शीद यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

गप्पा मारत बसले अन् काळ धावून आला
मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक तथा प्रसिद्ध गुत्तेदार बळीराम कुशाप्पा पवार (४८) आणि 'जनता अर्थ मुव्हर्स'चे मालक लाडनशहा मूर्शीद (५२) हे दोघे आपल्या काही मित्रांसह जकेकूर चौरस्त्यावरील एका हॉटेलबाहेर लिंबाच्या झाडाखाली गप्पा मारत बसले होते. याचवेळी सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने जाणाऱ्या कारचे (क्र. TS 34 F 4706) टायर फुटले. कार इतक्या वेगात होती की, चालकाचे नियंत्रण सुटून ती महामार्गापासून दूर अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये घुसली.

दोन जखमींची प्रकृती चिंताजनक
या भीषण धडकेत बळीराम पवार आणि लाडनशहा मूर्शीद यांचा जागीच अंत झाला. तर सचिन भीमराव कुटार (२८) आणि हॉटेल चालक महादेव देडे (३०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर काहींनी कार आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून वेळीच धाव घेतल्याने त्यांचे प्राण वाचले. विशेष म्हणजे, कारमधील प्रवाशांना कोणतीही गंभीर इजा झाली नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर उमरगा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title : अनपेक्षित त्रासदी: टायर फटने से कार दुर्घटनाग्रस्त, दो की मौत

Web Summary : उमरगा के पास टायर फटने से एक कार सड़क किनारे होटल में घुस गई, जिससे पूर्व पार्षद बलिराम पवार और व्यवसायी लाडनशाह मुर्शिद की मौत हो गई। दुर्घटना में दो अन्य गंभीर रूप से घायल हो गए। कार अनियंत्रित होकर होटल में जा घुसी जहाँ लोग बातचीत कर रहे थे।

Web Title : Unforeseen Tragedy: Tire Blowout Causes Car to Crash, Killing Two

Web Summary : A tire blowout caused a car to crash into a roadside hotel near Umarga, killing former corporator Baliram Pawar and businessman Ladanshah Murshid. Two others were seriously injured in the accident. The car lost control and hit the hotel where people were chatting.