नोकरीच्या नावावर सुशिक्षित बेरोजगारांची लूट; बनावट जॉईनिंग लेटर देऊन उकळले लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 12:17 IST2026-02-26T12:17:12+5:302026-02-26T12:17:45+5:30

वाशीत ६ तरुणांना बनावट नियुक्तीपत्रे देऊन फसवलं; मुंबईतील रॅकेटचा पर्दाफाश?

Dharashiv News: Washi Job Fraud: Rs 15 Lakh Scammed from 6 Youths; Fake Joining Letters Issued, FIR Filed | नोकरीच्या नावावर सुशिक्षित बेरोजगारांची लूट; बनावट जॉईनिंग लेटर देऊन उकळले लाखो रुपये

नोकरीच्या नावावर सुशिक्षित बेरोजगारांची लूट; बनावट जॉईनिंग लेटर देऊन उकळले लाखो रुपये

वाशी : शासकीय नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून ६ सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून १५ लाख रुपये उकळून त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार वाशी येथे समोर आला आहे. या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या फसवणुकीचे धागेदोरे मोठ्या रॅकेटपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वाशी येथील बाळासाहेब पंडितराव सुकाळे यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. सुकाळे यांचा मुलगा आणि इतर ५ तरुणांना शासकीय नोकरी लावण्याचे प्रलोभन आरोपींनी दिले होते. १७ मे २०२४ ते ६ जानेवारी २०२५ या कालावधीत हा सर्व व्यवहार झाला. आरोपींनी केवळ पैसेच घेतले नाहीत, तर या तरुणांना खोटी जॉईनिंग लेटर्स (नियुक्तिपत्रे) सुद्धा दिली. मात्र, ही पत्रे बनावट असल्याचे लक्षात येताच आपल्याला फसविले गेल्याचे या तरुणांच्या लक्षात आले. सुकाळे यांनी आरोपींकडे पैशांची मागणी केली. आरोपींनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. सततच्या पाठपुराव्यानंतर ३ लाख १५ हजार रुपये परत केले, मात्र उर्वरित ११ लाख ८५ हजार रुपये देण्यास टाळाटाळ केली. इतकेच नव्हे तर, पैसे मागितल्यास सुकाळे व त्यांच्या सहकाऱ्यांना धमकावण्यात आले. आरोपींचा शिरजोरपणा वाढल्याने शेवटी सुकाळे यांनी २४ फेब्रुवारी रोजी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी संबंधित आराेपींविरुद्ध वाशी पाेलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अजयसिंह भाळे अधिक तपास करत आहेत.

अशा प्रकारे उकळले पैसे
नवाब उर्फ रईसोद्दीन हमीद काझी (वाशी) याने काही रक्कम रोख स्वरूपात घेतली.
संदीप चंद्रकांत चांदिवडेकर (मुंबई) याच्या ‘फोन पे’ नंबरवर काही रक्कम पाठवण्यात आली.
उर्वरित रक्कम ‘श्री स्वामी समर्थ’ या नावाच्या बँक खात्यावर जमा करून घेण्यात आली.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल
नवाब उर्फ रईसोद्दीन हमीद काझी (रा. वाशी), संदीप चंद्रकांत चांदिवडेकर (रा. मुंबई), सनी (रा. मुंबई, पूर्ण नाव माहित नाही), स्वप्निल मोरे (रा. मुंबई) यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

कोणत्याही अनोळखी व्यक्तीला किंवा कंपनीला नोकरीसाठी पैसे देऊ नका. नोकरीच्या अशा जाहिराती संशयास्पद वाटल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
शंकर शिंदे, पोलिस निरीक्षक, वाशी.

Web Title : नौकरी के नाम पर ठगी: फर्जी पत्र से लाखों लूटे।

Web Summary : नवी मुंबई के वाशी में बेरोजगार युवाओं को नौकरी का झूठा वादा करके ₹15 लाख की ठगी की गई। पुलिस जांच कर रही है, चार लोगों पर मामला दर्ज। पैसे मांगने पर पीड़ितों को धमकाया गया।

Web Title : Job seekers defrauded: Fake letters used to steal lakhs.

Web Summary : Unemployed youths in Vashi were cheated of ₹15 lakhs with fake job offers and appointment letters. Police are investigating a potential racket, and four individuals have been charged. Victims were also threatened when they demanded their money back.