शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा पाठलागामुळे १० कोटींच्या 'हाशीश ऑइल'ची बॅग झाडीत फेकली; धाराशिवमध्ये खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 11:35 IST

पोलिसांनी मध्यरात्री केला कारचा पाठलाग; नळदुर्गमध्ये फिल्मी स्टाईलने पकडला ड्रग्जचा साठा

नळदुर्ग (जि. धाराशिव) : कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदीदरम्यान येथील पोलिसांनी १० कोटी ३० लाख २० हजार रुपये किमतीचे ‘हाशीश ऑइल’ नावाचे अमली पदार्थ जप्त करीत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. बुधवारी मध्यरात्री नळदुर्ग-तुळजापूर रोडवरील नळदुर्ग जलशुद्धीकरण टाकीजवळ ही कारवाई करण्यात आली.

नळदुर्ग-तुळजापूर रोडवर तुळजापूरकडून नळदुर्गकडे संशयास्पदरित्या भरधाव वेगाने येणारी कार (क्र. एमएच १२ / जीव्ही १५१८) अतिशय वेगाने पोलिसांना संशयास्पद वाढली. यामुळे पोलिसांनी तिचा पाठलाग केला. यावेळी पोलिस मागे असल्याचे लक्षात येताच कारमधील दुसऱ्या व्यक्तीने जवळपास दहा किलो वजनाची काळी बॅग नळदुर्ग-तुळजापूर रोडवरील नळदुर्ग शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळील दाट झाडीत फेकून दिली. पोलिसांनी या बॅगची तपासणी केली असता त्यात काळ्या रंगाची पावडर दिसून आली. याची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर गुरुवारी फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने याची पडताळणी केली. यावरून हा ‘हाशीश ऑइल’ सदृश अमली पदार्थ असल्याचे दिसून आले. सदर अंमली पदार्थांचे बाजारमूल्य १० कोटी ३० लाख २९ हजार रुपये आहे. या संदर्भात आयपीएस अधिकारी आर. एन. मेघना यांच्या आदेशानुसार दोन अनोळखी इसमांच्या विरोधात नळदुर्ग पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सपोनी साळुंखे हे करीत आहेत.

नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन पथकातकोंबिंग व नाकाबंदी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी दिले होते. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख व आयपीएस अधिकारी आय. एन. मेघना यांनी अंमलबजावणी केली. या पथकात सपोनि नंदकिशोर सोळुंखे, पोउपनि दत्तात्रय गित्ते, पोहेकॉ राजेंद्र गायकवाड, पोहेकॉ सखाराम मिटके, पोना धनराज कुंभार, पोअ सूर्यकांत फुलसुंदर, शंकर कांबळे, बालाजी शिंदे, नितीन शिंदे, नागेश रजपूत यांचा सहभाग होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Police chase leads to seizure of Hashish Oil in Dharashiv

Web Summary : Dharashiv police seized Hashish Oil worth ₹10.3 crore near Naldurg after a car chase. The suspects threw a bag containing the drugs into bushes. Two unidentified individuals have been booked, and investigation is underway.
टॅग्स :Drugsअमली पदार्थdharashivधाराशिवCrime Newsगुन्हेगारी