पोलिसांचा पाठलागामुळे १० कोटींच्या 'हाशीश ऑइल'ची बॅग झाडीत फेकली; धाराशिवमध्ये खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 11:35 IST2026-03-21T11:35:35+5:302026-03-21T11:35:49+5:30

पोलिसांनी मध्यरात्री केला कारचा पाठलाग; नळदुर्गमध्ये फिल्मी स्टाईलने पकडला ड्रग्जचा साठा

Dharashiv Crime:Naldurg Police Seize 'Hashish Oil' Worth ₹10.30 Crore; Dramatic Car Chase at Midnight | पोलिसांचा पाठलागामुळे १० कोटींच्या 'हाशीश ऑइल'ची बॅग झाडीत फेकली; धाराशिवमध्ये खळबळ!

पोलिसांचा पाठलागामुळे १० कोटींच्या 'हाशीश ऑइल'ची बॅग झाडीत फेकली; धाराशिवमध्ये खळबळ!

नळदुर्ग (जि. धाराशिव) : कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदीदरम्यान येथील पोलिसांनी १० कोटी ३० लाख २० हजार रुपये किमतीचे ‘हाशीश ऑइल’ नावाचे अमली पदार्थ जप्त करीत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. बुधवारी मध्यरात्री नळदुर्ग-तुळजापूर रोडवरील नळदुर्ग जलशुद्धीकरण टाकीजवळ ही कारवाई करण्यात आली.

नळदुर्ग-तुळजापूर रोडवर तुळजापूरकडून नळदुर्गकडे संशयास्पदरित्या भरधाव वेगाने येणारी कार (क्र. एमएच १२ / जीव्ही १५१८) अतिशय वेगाने पोलिसांना संशयास्पद वाढली. यामुळे पोलिसांनी तिचा पाठलाग केला. यावेळी पोलिस मागे असल्याचे लक्षात येताच कारमधील दुसऱ्या व्यक्तीने जवळपास दहा किलो वजनाची काळी बॅग नळदुर्ग-तुळजापूर रोडवरील नळदुर्ग शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळील दाट झाडीत फेकून दिली. पोलिसांनी या बॅगची तपासणी केली असता त्यात काळ्या रंगाची पावडर दिसून आली. याची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर गुरुवारी फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने याची पडताळणी केली. यावरून हा ‘हाशीश ऑइल’ सदृश अमली पदार्थ असल्याचे दिसून आले. सदर अंमली पदार्थांचे बाजारमूल्य १० कोटी ३० लाख २९ हजार रुपये आहे. या संदर्भात आयपीएस अधिकारी आर. एन. मेघना यांच्या आदेशानुसार दोन अनोळखी इसमांच्या विरोधात नळदुर्ग पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सपोनी साळुंखे हे करीत आहेत.

नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन पथकात
कोंबिंग व नाकाबंदी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी दिले होते. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख व आयपीएस अधिकारी आय. एन. मेघना यांनी अंमलबजावणी केली. या पथकात सपोनि नंदकिशोर सोळुंखे, पोउपनि दत्तात्रय गित्ते, पोहेकॉ राजेंद्र गायकवाड, पोहेकॉ सखाराम मिटके, पोना धनराज कुंभार, पोअ सूर्यकांत फुलसुंदर, शंकर कांबळे, बालाजी शिंदे, नितीन शिंदे, नागेश रजपूत यांचा सहभाग होता.

Web Title : पुलिस ने पीछा करके धाराशिव में करोड़ों का हशीश तेल जब्त किया

Web Summary : धाराशिव पुलिस ने पीछा करके नलदुर्ग के पास 10.3 करोड़ रुपये का हशीश तेल जब्त किया। संदिग्धों ने ड्रग्स से भरा बैग झाड़ियों में फेंक दिया। दो अज्ञात व्यक्तियों के खिलाफ मामला दर्ज, जांच जारी।

Web Title : Police chase leads to seizure of Hashish Oil in Dharashiv

Web Summary : Dharashiv police seized Hashish Oil worth ₹10.3 crore near Naldurg after a car chase. The suspects threw a bag containing the drugs into bushes. Two unidentified individuals have been booked, and investigation is underway.