शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 19:48 IST

शेतकरी आंदोलनात सहभागी प्रकरणी दोन माजी नगराध्यक्षांसह ७० ते ८० शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे 

- संतोष वीर भूम (धाराशिव): शहरातील गोलाई चौकात तालुक्यातील शेतकऱ्यांनी ६ ऑक्टोबर २०२५ रोजी रस्तारोको आंदोलन करत सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली होती. दरम्यान, जमावबंदीच्या सरकारी आदेशांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत पोलिस निरीक्षक गणेश कानगुडे यांनी आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मा. जिल्हाधिकारी व मा. पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार २६ सप्टेंबर २०२५ ते ९ ऑक्टोबर २०२५ पर्यंत जमावबंदी आहे. मात्र, शेतकरी भास्कर महादेव वारे ( रा. चिंचोली) यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ( दि. ६) अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी रस्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विठ्ठल राजाभाऊ बाराते, अरुण गाढवे, विलास  पवार, संदीपन कोकाटे, अनिल भोरे, बिभीषण भैरट, भागवत  साळुंकें, बप्पासाहेब गिलबिले, गणेश आंधरे, रंजीत पाटील, संजय गाढवे, विजयसिंह थोरात, अनिल शेडगे, रूपेश शेडगे, तानाजी पाटील, भगवान बांगर, शाहाजी शिंदे, विलास शाळू, दत्ता गाडवे, मनोज सुरवसे, प्रताप पाटील, अॅंड अरविंद हिवरे यांच्यासह इतर ८०-९० शेतकरी सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान मोठमोठ्याने घोषणाबाजी केली, हलगी वाजवली प्रबोधनात्मक भाषणे केली. दरम्यान, या आंदोलकांवर जमावबंदी आदेशाचे उलंघन केल्याचा ठपका ठेवत भारतीय न्याय संहिता कलम १२६(२), २२३, १८९(२) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

तर सरकारवर गुन्हे दाखल करा - खासदार ओमराजे निंबाळकरदरम्यान, सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या न्याय मागणी बाबत आंदोलन करताना आम्ही सार्वजनिक मालमत्तेचे कोणतेही नुकसान केले नाही. तरीही गुन्हे दाखल होणे धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया आंदोलक शेतकरी भास्कर वारे यांनी दिली आहे. तसेच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील शेकऱ्यांवर जर गुन्हे दाखल होत असतील तर शेतकरी आत्महत्या प्रकरणी तुम्ही सरकारवर गुन्हे दाखल करणार का? असा जाब पोलिस प्रशासनास विचारला असल्याची माहिती आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dharashiv: Farmers protesting for aid booked for violating restrictions.

Web Summary : Farmers in Dharashiv, protesting for immediate aid due to crop loss, face charges for violating prohibitory orders. MP Omraje Nimbalkar questioned the police action, asking if the government would be charged for farmer suicides.
टॅग्स :dharashivधाराशिवFarmerशेतकरीagitationआंदोलनomraje nimbalkarओमराजे निंबाळकरRainपाऊस