शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

संसाराची स्वप्ने पाहण्यापूर्वीच स्मशानशांतता! साखरपुडा होऊन ४ दिवस झाले अन् लातूरला परीक्षेला जाताना घात झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 18:34 IST

साखरपुड्याची मेहंदी सुकण्यापूर्वीच ‘अक्षय-अक्षया’चा शेवट; परीक्षेला जाताना भीषण अपघातात अंत

- सचिन बारकुलयेरमाळा (जि. धाराशिव) : ज्या घरांत चार दिवसांपूर्वी लग्नाची सनई वाजणार म्हणून आनंदाचे वातावरण होते, तिथे आज शोककळा पसरली आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर रत्नापूर पाटीजवळ रविवारी पहाटे झालेल्या एका भीषण कार अपघातात वाशी तालुक्यातील नुकताच साखरपुडा झालेल्या (नियोजित) वधू-वरांचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुणी आपल्या करिअरसाठी महत्त्वाची असलेली परीक्षा देण्यासाठी निघाली होती. मात्र वाटेतच काळाने त्यांच्यावर झडप घातली.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशी तालुक्यातील पारा येथील अक्षय रामभाऊ शिनगारे (२५) आणि वाशी येथील अक्षया सुनील चव्हाण (२३) यांचा साखरपुडा अवघ्या चार दिवसांपूर्वी, म्हणजेच मांजरसुंबा येथील एका मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला होता. अक्षयाची आज लातूर येथे महापारेषणची परीक्षा होती. ही परीक्षा देण्यासाठी अक्षय आणि अक्षया पहाटेच आपल्या कारने क्र. (एमएच २५ बीएफ ५०६४) वाशी येथून लातूरकडे निघाले होते. सकाळी ६ च्या सुमारास रत्नापूर पाटीजवळील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार थेट येडशी टोल वेच्या लोखंडी कमानीला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात अक्षया चव्हाण आणि अक्षय शिनगारे या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. कार चालवणारा अक्षय यादव सिरसट (२२) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नागरिकांची मदतीसाठी धावअपघाताचा आवाज ऐकताच रत्नापूर येथील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी चालकाला बाहेर काढून १०८ रुग्णवाहिकेमार्फत उपचारासाठी पाठवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले.

वाशी तालुक्यात हळहळलग्नाचे स्वप्न डोळ्यासमोर असताना आणि आयुष्याची नवी सुरुवात करण्यापूर्वीच या जोडप्याचा अशाप्रकारे अंत झाल्याने संपूर्ण वाशी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकीकडे परीक्षेची तयारी आणि दुसरीकडे संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या या तरुणीच्या अकाली जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dreams Dashed: Engaged Couple Killed En Route to Exam in Latur

Web Summary : A recently engaged couple died in a car accident near Ratnapur while traveling to Latur for an exam. Their car crashed into a toll booth, killing them instantly. The driver was critically injured. The tragedy has cast a pall of gloom over the region.
टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूdharashivधाराशिव