५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस हवालदारासह खासगी वकिलावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:31 IST2021-05-15T04:31:10+5:302021-05-15T04:31:10+5:30
तक्रारदार आणि त्यांच्या वडिलांवर कलम ३२४ भा. दं. वि.प्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा ...

५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस हवालदारासह खासगी वकिलावर गुन्हा
तक्रारदार आणि त्यांच्या वडिलांवर कलम ३२४ भा. दं. वि.प्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार भागवत पांडुरंग झोळ यांच्याकडे होता. दाखल गुन्ह्यामध्ये तक्रारदार व त्यांच्या वडिलांना जामीन मिळवून देण्यास मदत करण्यासाठी लोकसेवक भागवत झोळ यांनी दिनांक १२ मे रोजी तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. १३ मे रोजी पंचासमक्ष ५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. तसेच तक्रारदार यांचे अकलूज येथील वकील चंद्रकांत महादेव रिसवडकर यांनी गुन्ह्यास प्रोत्साहन दिल्याने याबाबत वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ही कारवाई उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे, पोलीस अंमलदार अर्जुन मार्कड, विष्णू बेळे, विशाल डोके, सिद्धेश्वर तावस्कर, चालक दत्तात्रय करडे यांनी केली.