भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 17:58 IST2025-11-12T17:56:55+5:302025-11-12T17:58:03+5:30

खाकी वर्दीतील भ्रष्टाचाराची हद्द! लोहारा पोलिसांमधील 'लाचखोर' चौघांना अटक

Corruption at its peak! Demand for 5 lakhs for gold despite taking 4 lakhs; In Lohara Four policemen including API arrested by ACB | भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात

भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात

धाराशिव : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे व सोलापूर यांच्या पथकाने धाराशिव जिल्ह्यातील लोहारा पोलीस ठाण्यामध्ये मोठी कारवाई करत पोलीस ठाणे प्रमुखासह (एपीआय) एकूण चार लोकसेवकांना लाच घेताना मंगळवारी ताब्यात घेतले आहे. तक्रारदाराच्या मित्रावरील गुन्ह्यात त्याला सह-आरोपी न करण्यासाठी या चौघांनी मिळून तक्रारदाराकडून सुरुवातीला सोन्याचे कडे व रोख रक्कम घेऊनही आणखी लाचेची मागणी केली होती.

३२ वर्षीय शेतकरी असलेल्या तक्रारदाराच्या मित्रावर लोहारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता. याच गुन्ह्यात तक्रारदाराला सह-आरोपी न करण्यासाठी आरोपी लोकसेवक ज्ञानेश्वर भीमराज कुकलारे (एपीआय), आकाश मधुकर भोसले (पोलीस शिपाई), अर्जुन शिवाजी तिघाडे (पोलीस नाईक) आणि निवृत्ति बळीराम बोळके (एएसआय) यांनी सुरुवातीला ५ लाख रुपयांची मागणी केली होती. पैसे नसल्यामुळे तक्रारदाराने स्वतःकडील १० तोळे वजनाचे सोन्याचे कडे काढून दिले. इतकेच नव्हे, तर आरोपींनी तक्रारदाराच्या भावाकडून परस्पर ४ लाख रुपये घेतले असल्याचे पडताळणीमध्ये निष्पन्न झाले. या सर्व रकमा स्वीकारल्यानंतरही आरोपी लोकसेवक पुन्हा ५ लाख रुपयांची मागणी करत होते, अशी तक्रार तक्रारदाराने ६ नोव्हेंबर २०२५ रोजी अँटी करप्शन ब्युरो, पुणे यांच्याकडे दिली. 

एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, सोन्याचे कडे स्वतःकडे ठेवल्याचे पोलीस भोसले व बोळके यांनी मान्य केले, तर एपीआय कुकलारे यांनी तक्रारदाराच्या भावाकडून ३ लाख रुपये स्वीकारल्याचे आणि उर्वरित २ लाख रुपये लाच म्हणून मागितल्याचे निष्पन्न झाले. यानंतर ११ नोव्हेंबर रोजी एसीबीच्या पथकाने लाेहारा तालुक्यातील भातागळी येथील तक्रारदाराच्या शेतात सापळा लावला. यावेळी आरोपी लोकसेवक अर्जुन शिवाजी तिघाड़े (पोलीस नाईक) यांनी तक्रारदाराकडून २ लाख रूपये लाच स्वीकारली असता, सायंकाळी १८:५६ वाजता त्यांना रंगेहात पकडण्यात आले. 

सापळा कारवाईनंतर सर्व चार आरोपी लोकसेवकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध लोहारा पोलीस ठाणे, जिल्हा धाराशिव येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार कलम ७, ७अ आणि १२ अन्वये गुन्हा नोंद नाेंदविला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक प्रशांत चौगुले (सोलापूर) आणि पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर (पुणे) यांनी पर्यवेक्षक अधिकारी दयानंद गावड़े (उप अधीक्षक, पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

Web Title : भ्रष्टाचार की हद: सोना, 4 लाख लेने के बाद भी पुलिसकर्मी गिरफ्तार

Web Summary : धाराशिव में API सहित चार पुलिस अधिकारियों को रिश्वत लेने के आरोप में गिरफ्तार किया गया। उन्होंने शिकायतकर्ता के दोस्त को मामले में शामिल न करने के बदले सोना और ₹4 लाख लेने के बाद भी रिश्वत की मांग की। एक अधिकारी ₹2 लाख लेते हुए रंगे हाथों पकड़ा गया।

Web Title : Bribery Exceeds Limits: Police Officers Arrested for Demanding More After Taking Gold, Cash

Web Summary : Four police officers in Dharashiv, including the API, were arrested by the ACB for demanding additional bribes after already accepting gold and ₹4 lakhs from a complainant to avoid implicating his friend in a case. A trap was laid, and one officer was caught red-handed accepting ₹2 lakhs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.