बसची दुचाकीला धडक, महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:33 IST2021-02-24T04:33:56+5:302021-02-24T04:33:56+5:30

उस्मानाबाद -ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव बसने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू ...

The bus hit the two-wheeler, killing the woman | बसची दुचाकीला धडक, महिला ठार

बसची दुचाकीला धडक, महिला ठार

उस्मानाबाद -ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव बसने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना २१ फेब्रुवारी राेजी मुर्टा फाटा येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, भरधाव बस २१ फेब्रुवारी राेजी मुर्टा फाटा येथून पुढे जात हाेती. यावेळी समाेरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीला पाठीमागून जाेराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या पार्वती प्रभाकर चपहे (वय ३२, रा. लाेहारा) यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा मानव चपहे व चालक संताेष पवार हे जखमी झाले. अपघातानंतर चालकाने बस घटनास्थळी साेडून पाेबारा केला. याप्रकरणी मयताचे भाऊ परमेश्वर मुळे यांनी नळदुर्ग ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून बसचालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नाेंद करण्यात आला आहे.

Web Title: The bus hit the two-wheeler, killing the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.