कळंबमध्ये आडत व्यापाऱ्याच्या वॉचमनचा निर्घृण खून; गेटसमोर आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 11:35 IST2021-06-05T11:33:07+5:302021-06-05T11:35:15+5:30

मृताच्या छातीवर गंभीर जखम आहे. ही जखम नेमकी कोणत्या हत्याराची आहहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

The brutal murder of an Adat merchant's watchman in Kalamb; death body found in front of the gates | कळंबमध्ये आडत व्यापाऱ्याच्या वॉचमनचा निर्घृण खून; गेटसमोर आढळला मृतदेह

कळंबमध्ये आडत व्यापाऱ्याच्या वॉचमनचा निर्घृण खून; गेटसमोर आढळला मृतदेह

कळंब(जि. उस्मानाबाद ) : शहरातील एका प्रतिष्ठित आडत व्यापाऱ्याकडे 'वॉचमन' म्हणून कार्यरत असलेल्या पन्नास वर्षीय व्यक्तिची शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. यामुळे बाजारपेठचे शहर असलेल्या कळंबमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

कळंब येथील मार्केट यार्ड भागात अजय साहेबराव जाधव यांचा आडत व्यावसाय आहे. याच आडत दुकानाच्या वरच्या मजल्यावर जाधव कुंटूब वास्तव्य करत आहे. जाधव यांच्या याच आडतीवर मागच्या वीस वर्षांपासून मच्छिंद्र छगन माने (रा. फरिदनगर डिकसळ भाग ) हे वॉचमन म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे माने हे जाधव यांच्या आडतीवर नाईट ड्यूटी बजावत होते. यादरम्यान, रात्री दोननंतर अज्ञात व्यक्तिंनी निर्घृण हत्या केली आहे.

सकाळी जाधव यांचा पुतण्या जॉगिंगकरीता घराबाहेर पडत असताना हा भयंकर प्रकार समोर आला आहे. यानंतर त्यांनी घटनेची पोलिसांना कल्पना दिली. याठिकाणी सद्या कळंब पोलिस दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत. सदर मयताच्या छातीवर गंभीर जखम आहे. ही जखम नेमकी कोणत्या हत्याराची आह़ हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवाय हा प्रकार दरोड्याच्या प्रयत्नातून झाला आहे की अन्य कशामुळे ते पण स्पष्ट झाले नव्हते.

Web Title: The brutal murder of an Adat merchant's watchman in Kalamb; death body found in front of the gates