फसवेगिरी: भाजप पदाधिकाऱ्यांनी कर्ज नसणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलनात केलं उभं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 13:35 IST2020-02-26T13:34:53+5:302020-02-26T13:35:40+5:30
भाजपचे आंदोलन म्हणजे नौटंकी असल्याचा आरोप विरोधक करत आहे.

फसवेगिरी: भाजप पदाधिकाऱ्यांनी कर्ज नसणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलनात केलं उभं
उस्मानाबाद : राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांची घोर फसवणूक सुरु आहे. महिलांवरील अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचा आरोप करीत भाजपाच्या वतीने मंगळवारी निषेध आंदोलन करण्यात आले. मात्र यावेळी चक्क कुठलेही कर्ज नसलेले शेतकऱ्यांना आंदोलनच्या ठिकाणी आणून त्यांच्या हाती 'कोरा सातबारा' देण्यात आला. तर यातून भाजपची नौटंकी उघड झाली असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
भाजपकडून राज्यभरात ठाकरे सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्याप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यातसुद्धा भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून जिल्हा कचेरीसमोर आंदोलन करण्यात आले. याचवेळी काही शेतकरी आपल्या कामानिमित्त सरकारी कार्यालयात आले होते. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी संबधीत शेतकऱ्यांना आंदोलनाच्या ठिकाणी आणून त्यांच्या हाती प्रातिनिधिक स्वरुपात "कोरा सातबारा" देण्यात आले होते.
विशेष म्हणजे, संबधीत शेतकऱ्यांकडे शेतीविषयक कुठलेही कर्ज नाही. 'त्या' शेतकऱ्यांना माध्यमांच्या प्रतिनिधीनी 'आपल्याकडे किती कर्ज आहे'? असा प्रश्न केला असता, “माझ्याकडे कसलेही कर्ज नाही, मी माझ्या कामानिमित्त आलो आहे. मला येथे बोलावून हाती कागद ठेवला”,असे सांगितले.त्यामुळे भाजपचे आंदोलन म्हणजे नौटंकी असल्याचा आरोप विरोधक करत आहे.