पाण्याच्या बाटलीवरून हॉटेल मालकासह कामगारास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 17:15 IST2018-09-20T17:13:48+5:302018-09-20T17:15:08+5:30

पाण्याची बाटली देण्याच्या कारणावरून हॉटेल मालकासह कामगारास बेदम मारहाण करण्यात आली.

Attacks on worker and hotel owner on a bottle of water | पाण्याच्या बाटलीवरून हॉटेल मालकासह कामगारास मारहाण

पाण्याच्या बाटलीवरून हॉटेल मालकासह कामगारास मारहाण

तुळजापूर (उस्मानाबाद ) : पाण्याची बाटली देण्याच्या कारणावरून हॉटेल मालकासह कामगारास बेदम मारहाण झाली़ ही घटना तालुक्यातील कसई शिवारात मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी पाच जणांविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

तुळजापूर तालुक्यातील कसई शिवारात अमोल उमाकांत जांभळे (रा़मंगरूळ) यांचे हॉटेल आहे़ या हॉटेलमध्ये आलेल्या पाच जणांनी मंगळवारी रात्रीच्या सुमारास पाण्याची बाटली देण्याच्या कारणावरून अमोल जांबळे व कामगार शेखू तांबोळी यास शिवीगाळ करीत काठीने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली़ या मारहाणीत जखमी झालेले हॉटेल मालक जांभळे यांच्या फिर्यादीवरून संतोष सदाशिव यमगर (रा़यमगरवाडी ता़तुळजापूर) व इतर चौघांविरूध्द बुधवारी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोना लक्ष्मीकांत माने हे करीत आहेत़

Web Title: Attacks on worker and hotel owner on a bottle of water