शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

पद्मसिंह पाटलांचा प्रस्ताव, प्रतिभा पवार यांचा पुढाकार...'अशी' आहे अजितदादांच्या लग्नाची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 18:53 IST

Ajit Pawar Death: तेरचा लाडका 'जावई' हरपला! लाडक्या जावयास श्रद्धांजलीसाठी पद्मसिंह पाटलांच्या वाड्यासमोर जमले हजारो ग्रामस्थ

तेर (धाराशिव): राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि धाराशिव जिल्ह्यातील त्यांचे सासुरवाडीचे गाव 'तेर' पूर्णपणे सुन्न झाले. बारामतीचे पवार आणि तेरचे पाटील घराणे यांच्यातील ४० वर्षांचे कौुटुंबिक आणि राजकीय नाते आज एका करुण वळणावर येऊन थांबले आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने तेर गटातून सुनेत्राताईंच्या भाचेसून अर्चना पाटील प्रचारात व्यस्त होत्या. बुधवारी सकाळी ८ वाजता विठ्ठल नगर भागात 'डोअर टू डोअर' प्रचार सुरू असतानाच, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा फोन आला. बातमी ऐकताच अर्चना पाटलांच्या डोळ्यांतील अश्रूंचा बांध फुटला. कार्यकर्त्यांना "मी येते," इतकेच शब्द सांगून त्या तातडीने तेर सोडून निघाल्या. काही क्षणातच गावभर बातमी पसरली आणि निवडणुकीची धामधूम थांबून संपूर्ण गाव डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वाड्यासमोर जमले.

अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!

१९८५ ची 'ती' रेशीमगाठतेरचे डॉ. पद्मसिंह पाटील यांनी राजकारणात आपला दबदबा निर्माण केला होता. ते खा. शरद पवार यांचे विश्वासू सहकारी होते. राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी तेही एक. पवार व पाटील यांच्यात प्रचंड राजकीय सख्य होते. १९८५ साली खुद्द डॉ. पाटील यांनीच शरद पवार व प्रतिभाताई पवार यांच्याकडे भगिनी सुनेत्राताईंचा हात अजितदादांच्या हाती देण्यासाठीचा प्रस्ताव मांडला. यानंतर प्रतिभाताईंनी पुढाकार घेतला. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम मुंबईतच डॉ. पाटील यांच्या बंधूंच्या घरी झाला. पसंती कळवल्यानंतर ३० डिसेंबर १९८५ रोजी बारामतीत दोघांची लग्नगाठ बांधली गेल्याचे डॉ. पाटील यांचे विश्वासू साथी रामलिंग लामतुरे यांनी सांगितले.

शेवटचा दौरा आणि आठवणीअजितदादांनी पाच वर्षांपूर्वी मेहुणे अमर पाटील यांच्या निधनानंतर तेरला भेट दिली होती. त्यानंतर २२ नोव्हेंबर २०२५ रोजी मल्हार पाटील यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त त्यांनी नळदुर्ग येथे घेतलेली सभा जिल्ह्यासाठी शेवटची ठरली. आज पक्षभेद विसरून सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गाव बंद ठेवून आपल्या जावयाला श्रद्धांजली वाहिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Padma Singh Patil's Proposal: How Ajit Pawar Became Ter's Son-in-Law

Web Summary : Ajit Pawar's sudden demise stunned his in-laws' village, Ter. Padma Singh Patil proposed Pawar's marriage to Sunetra, facilitated by Pratibha Pawar. Their 40-year bond ended tragically. Pawar last visited Ter for a wedding in 2025. The village mourns.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारdharashivधाराशिवSunetra Pawarसुनेत्रा पवारSharad Pawarशरद पवार