शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अगोदर फुटल्या़़ नंतर कुजल्या़़

By admin | Updated: July 15, 2014 00:53 IST

उस्मानाबाद : अपघातात मोडलेल्या आणि कारवाईदरम्यान सापडलेल्या शेकडो दुचाकी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या आवारात कुजत पडल्या आहेत़

उस्मानाबाद : अपघातात मोडलेल्या आणि कारवाईदरम्यान सापडलेल्या शेकडो दुचाकी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या आवारात कुजत पडल्या आहेत़ शहर पोलिस ठाण्याच्या परिसरातही अशीच अवस्था दिसून येते़ चोरीस गेलेल्या आणि सापडलेल्या वाहनांचा अहवाल वरिष्ठांकडे जातो़ त्यामुळे चोरीचे वाहन परत नेण्याच्या हलचाली होतात़ मात्र, ज्या गाडीमालकाची ओळखच पटत नाही त्या मात्र, ठाण्याच्या आवारातच वर्षानुवर्षे कुजत पडतात़जिल्ह्यातील महामार्गांसह ग्रामीण भागातील मार्गावर सरासरी दररोज एक अपघात ठरलेला ! तर दुचाकी, चारचाकी चोऱ्यांच्या घटनाही वाढल्या आहेत़ अपघातात चक्काकूर झालेली वाहने संबंधित गाडीमालक न्यायालयातून सोडवून नेतो़ मात्र, अनेक गाड्यांचे मालक कोण याचा पत्ता लागू न शकलेल्या आणि अपघातात मोडलेल्या गाड्या नेण्याकडे अनेकांनी दूर्लक्ष केल्याचे दिसत आहे़ गुन्ह्याचा तपास लागल्यानंतर संबंधित वाहनाचा मालक नसेल तर गाडीचा लिलाव न्यायालयाच्या सूचनेनुसार करण्यात येतो़ मात्र, जिल्ह्याच्या अनेक पोलिस ठाण्यात दुचाकींचा खच साचला असून, वर्षानुवर्षापासून त्या कुजत चालल्या आहेत़ अशा वाहनांचा लिलाव करण्याकडेही अधिकाऱ्यांनी दूर्लक्ष केले आहे़ या गाड्यांचा लिलाव झाला तर शासनाचाच महसूल वाढणार आहे़ त्यामुळे कुजणाऱ्या गाड्यांचा लिलाव करून गुंतलेली ठाण्याची जागाही मोकळी करण्याची गरज आहे़ (प्रतिनिधी)चोरीस गेलेल्या वाहनांची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल होताच वाहनाचा क्रमांक पोलिस दलामार्फत राज्यभर पसरतो़ तसेच पोलिसांना विविध कारवाईदरम्यान सापडलेली चोरीच्या वाहनांचाही अहवाल वरिष्ठांकडे जातो़ त्यामुळे चोरीस गेलेली व सापडलेली वाहने यांचे क्रमांक पाहिल्यानंतर तपासाअधिकाऱ्यासह वाहने मिळविण्यासाठी फिर्यादीही धावपळ करतो़ अनेक वाहनांना वालीच नसल्याने त्या मात्र पोलिस ठाण्याच्या आवारात कुजत पडतात़