दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर शिक्षकाने केला अत्याचार; पालकांमध्ये भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 13:14 IST2022-07-07T13:14:34+5:302022-07-07T13:14:47+5:30

उस्मानाबाद जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

A minor girl studying in 10th standard has been raped by a teacher in Osmanabad. | दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर शिक्षकाने केला अत्याचार; पालकांमध्ये भीती

दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर शिक्षकाने केला अत्याचार; पालकांमध्ये भीती

उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर शाळेतील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले, असून गेली अनेक दिवस हा शिक्षक या मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. यात ही मुलगी दोन महिन्याची गर्भवती राहिली.

गाडीवर प्रवास करत असताना मुलीला रक्तस्रावाचा त्रास झाला. त्यामुळे घरच्यांनी तिला उपचारासाठी उस्मानाबाद येथील महिला रुग्णालयात दाखल केले असता मुलगी दोन महिन्याची गर्भवती असल्याचे उघड झाले. त्यातून हा प्रकार उघडकीस आला. स्वतः मुलीनेच या नराधम शिक्षकाविरोधात जबाब दिला. 

कळंब पोलिसात या नराधम शिक्षका विरोधात पोक्सो व बलात्कार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला. आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेत कोर्टात हजर केले असता आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान कळंब शहरात अनेक खेडेगावातील मुली शिक्षणासाठी येत असतात. शिक्षकानेच हे कृत्य केल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read in English

Web Title: A minor girl studying in 10th standard has been raped by a teacher in Osmanabad.