कळंबरोडवर चोरट्यांचा धुमाकूळ; गाड्या अडवून हळद, सोयाबीन पळवले
By चेतनकुमार धनुरे | Updated: September 26, 2023 19:13 IST2023-09-26T19:13:39+5:302023-09-26T19:13:50+5:30
या प्रकरणी कळंब ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळंबरोडवर चोरट्यांचा धुमाकूळ; गाड्या अडवून हळद, सोयाबीन पळवले
धाराशिव : वसमतच्या मोंढ्यातून १४ लाखांची हळद घेऊन कळंबमार्गे निघालेल्या एका ट्रकला अडवून चोरांनी त्यातील एक लाखाची हळद पळविल्याची घटना घडली आहे. याच रस्त्यावर अन्य ट्रकमधून १५ पोती सोयाबीनही या चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार घडला असून, रात्री उशिरा कळंब ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी येथील राजेश पांडुरंग शिंदे यांनी वसमत येथील मोंढ्यातून त्यांच्याकडील टेम्पोमध्ये ९ टन ५७० किलोग्रॅम हळद भरली होती. १५ हजार रुपये प्रतिक्विंटल या दरानुसार त्याची किंमत सुमारे १४ लाख ३५ हजार रुपये इतकी भरते. ही हळद घेऊन धाराशिव जिल्ह्यातील कळंबमार्गे पुढे जात असताना कन्हेरवाडी पाटीनजीक सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास सहा अनोळखी व्यक्तींनी राजेश शिंदे यांच्या गळ्याला कोयता लावून जिवे मारण्याची धमकी देत टेम्पोतील १ लाख १२ हजार रुपये किमतीची हळद चोरून पळ काढला.
दरम्यान, पाठोपाठ याच रस्त्यावरून सोयाबीन घेऊन निघालेल्या मांडवा येथील अशोक खंदारे यांनाही चोरांनी धमकी देत आतील ६७ हजार ५०० रुपये किमतीचे सोयाबीन पळवून नेले.