निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 12:20 IST2025-09-14T12:20:21+5:302025-09-14T12:20:51+5:30

निम्न तेरणा प्रकल्पतून शनिवारी १३ सप्टेंबरच्या रात्री दहा वाजता ४ वक्रद्वारे १० सेंटिमीटरने उचलले असून १५३० क्यूमेक्स इतका विसर्ग नदीपात्रात चालू होता.

7636 cusecs of water released from Lower Terna project, alert issued to villages along the river | निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

लोहारा (जि. धाराशिव) : तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पतून शनिवारी १३ सप्टेंबरच्या रात्री दहा वाजता ४ वक्रद्वारे १० सेंटिमीटरने उचलले असून १५३० क्यूमेक्स इतका विसर्ग नदीपात्रात चालू होता. असे असतानाच रविवारी सकाळी पावणेअकरा वाजता १० वक्रद्वारे २० सेंटिमीटरने उचलण्यात आले. याद्वारे ७६३६ क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. आहे.

लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पातून १६ ऑगस्ट राेजी १० दरवाजे उघडण्यात आले होते. १८ ऑगस्ट राेजी प्रकल्पाचे सहा द्वार १० सेंटिमीटरने उघडून तेरणा नदीपात्रात ५७.८६१ घमी प्रतिसेकंदने विसर्ग सुरू हाेता. त्यानंतर २८ ऑगस्ट राेजी दुपारी बारा वाजता निम्न तेरणा प्रकल्पाचे १० वक्रद्वारे १० सेंटिमीटरने उचलण्यात आले. याद्वारे ३८१६ क्यूसेक्स इतका विसर्ग नदीपात्रात चालू सुरू होता. दरम्यान, १३ सप्टेंबर राेजी धाराशिव तालुक्यातील तेरसह परीसरात मोठ्याप्रमाणात पाऊस झाल्याने तेरणा धरणात पाण्याची आवक वाढली. त्यामुळे तेरणा धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे.

पाण्यामुळे लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्याने रात्री १० वाजता निम्न तेरणा प्रकल्पाचे २ दरवाजे १० सेंटीमीटरने उघडण्यात आले.पाण्याची आवक सुरूच असल्याने आणखी ४ वक्रद्वारे १० सेंटिमीटरने उचलले. असे असतानाच १४ सप्टेंबर राेजी सकाळी पावणेअकरा वाजता निम्न तेरणा प्रकल्पाचे एकूण १० दरवाजे २० सेंटीमीटरने उघडण्यात आले असून तेरणा नदीपात्रात ७६३६ क्यूसेक्स इतका विसर्ग वाढ करण्यात आला आहे. या पाण्याच्या विसर्गामुळे तेरणा नदीकाठच्या गावांना संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी, पशुपालक यांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

सतर्कतेचा इशारा

प्रशासनाने नदीकाठच्या गावातील नागरिकांना, शेतकऱ्यांसाठी आणि पशुपालकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये आपले गोठे, घरे, विजेच्या मोटारी, शेतीची पिके, जनावरे आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, पाण्याची आवक वाढतच राहिल्यास दुपारी अजून दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे, असेही निम्न तेरणा प्रकल्पाचे शाखा अभियंता एस. बी. गंभीरे यांनी सांगितले.

Web Title: 7636 cusecs of water released from Lower Terna project, alert issued to villages along the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.