आसामचा स्टार सिंगर झुबीन गर्गच्या मृत्यूचं गूढ अद्याप उलगडलेलं दिसत नाही. मात्र पोलिसांचा दावा आहे की, या प्रकरणाचा तपास करणारी एसआयटी आणि सीआयडी पथकं सात दिवसांत सत्य उलगडतील. मृत्यूमागचं सत्य बाहेर येईल. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाची चौकशी केली जात आहे. सिंगर झुबीन गर्गचा १९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना मृत्यू झाला.
तपास पथकाने सिंगरची पत्नी गरिमा सॅकिया यांच्या संशयावरून दोन जणांना अटक केली आहे. यामध्ये झुबीनचा मॅनेजर आणि सिंगापूरमधील नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलच्या आयोजकांचा समावेश आहे. गरिमा यांनी पतीच्या मृत्यूच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रत्येकावर माझा संशय असल्याचं म्हटलं आहे.
फेस्टिव्हलचे आयोजक श्यामकानु महंत आणि मॅनेजर सिद्धार्थ शर्मा यांना दिल्लीत अटक करून गुवाहाटीला आणण्यात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महंत सिंगापूरमध्ये लपून बसला होता, तर त्याच्या आणि शर्माविरुद्ध आधीच लूकआउट नोटीस जारी करण्यात आली होती, ज्यामध्ये त्यांना ६ ऑक्टोबरपर्यंत गुवाहाटी येथील सीआयडी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते.
एसआयटीने झुबीनचा ड्रमर शेखर ज्योती गोस्वामी, त्याचा भाऊ आणि पोलीस अधिकारी संदीपन गर्ग, अभिनेत्री निशिता गोस्वामी, अमृतप्रभा आणि स्थानिक टीव्ही चॅनेलचे मालक संजीव नारायण यांची आधीच चौकशी केली आहे. झुबीनच्या मृत्यूच्या वेळी हे सर्वजण सिंगापूरमध्ये होते. आसामचे डीजीपी हरमीत सिंग यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार सीआयडी आणि एसआयटीच्या देखरेखीखाली तपास पारदर्शकपणे सुरू असल्याचं म्हटलं आहे.
Web Summary : Singer Zubeen Garg's death investigation intensifies. His manager and festival organizer were arrested based on his wife's suspicion. Others present in Singapore during his death are being questioned. Police aim to reveal the truth soon.
Web Summary : गायक ज़ुबीन गर्ग की मौत की जांच तेज। पत्नी के संदेह पर मैनेजर और फेस्टिवल आयोजक गिरफ्तार। मौत के वक्त सिंगापुर में मौजूद अन्य लोगों से पूछताछ। पुलिस जल्द सच उजागर करेगी।