घर नावावर कर म्हणत युट्यूबरने आईला मारहाण केली; व्हिडीओही झाला व्हायरल! कोण आहे वंशिका हापूर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 14:07 IST2025-11-07T14:06:29+5:302025-11-07T14:07:59+5:30
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर वंशिका हापूर आता तिच्या आईला मारहाण केल्याच्या घटनेमुळे चर्चेत आली आहे.

घर नावावर कर म्हणत युट्यूबरने आईला मारहाण केली; व्हिडीओही झाला व्हायरल! कोण आहे वंशिका हापूर?
रील्स आणि म्युझिक व्हिडीओमुळे लोकप्रिय झालेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर वंशिका हापूर आता तिच्या आईला मारहाण केल्याच्या घटनेमुळे चर्चेत आली आहे. आईसोबत झालेल्या भांडणाचा आणि मारहाणीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये वंशिका तिच्या आईला शिवीगाळ करताना आणि धक्के मारताना दिसत आहे. या घटनेनंतर आईने स्वतः पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी वंशिकाविरुद्ध मारहाण, धमकावणे आणि शिवीगाळ केल्याची तक्रार दिली आहे.
कोण आहे वंशिका?
हापूरच्या आदर्श नगर कॉलनीत राहणारी वंशिका सोशल मीडियाच्या जगतात खूप प्रसिद्ध आहे. युट्यूबवर तिच्या चॅनलचे १.८९ लाख सबस्क्रायबर्स आहेत. तर, इंस्टाग्रामवर तिचे ७.४२ लाख फॉलोअर्स आहेत आणि तिच्या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळतात. फेसबुकवरही ती प्रसिद्ध असून,तिचे १.३ मिलियन फॉलोअर्स आहेत.
वंशिका अनेकदा तिच्या काळ्या रंगाच्या थार गाडीसोबत आणि जिममध्ये व्हिडीओ बनवताना दिसते. तिने २०२२ मध्ये यूट्यूब चॅनल सुरू केले आणि आतापर्यंत २१० व्हिडीओ अपलोड केले आहेत.
मारहाणीची तक्रार आणि वादाचे कारण काय?
सध्या वंशिकाचा व्हिडीओ व्हायरल होत असून, घर नावावर करण्यावरून आणि दागिने हिसकावण्यावरून वंशिकाने स्वतःच्या आईला मारहाण केली. वंशिकाची आई बंटी हिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिच्या आईने आरोप केला आहे की, मुलगी वंशिका नेहमीच तिला मारहाण करते आणि ती आपल्या वडिलांनाही सोडत नाही. तिने अनेक वेळा पालकांना घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही आईने केला आहे.
Meet Vanshika Hapur — a YouTuber by profession, disgrace by action.
— ShoneeKapoor (@ShoneeKapoor) November 6, 2025
Along with her manager-turned-live-in partner Himanshu, she beat up her own parents — yes, the very people who raised her — just to throw them out of their own house and grab their property.
This is not a crime… pic.twitter.com/wNv5PSnFeg
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, वंशिका प्लॉट आणि घरावरुन आईशी भांडताना दिसत आहे, त्यानंतर हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. लेक युट्यूबर असतानाही वंशिकाची आई मजुरीचे काम करते. आई आणि मुलीमध्ये सुरू असलेल्या वादाचे एक कारण वंशिकाच्या यूट्यूब चॅनलचा मॅनेजर हिमांशु असल्याचेही सांगितले जात आहे. पोलिसांनी आईच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.