'तो स्वत: मुलीला गाडीवरुन घेऊन आला होता'; मालाडमधील घटनेबाबत पालकमंत्र्यांची माहिती

By मुकेश चव्हाण | Updated: January 5, 2021 10:27 IST2021-01-05T10:26:56+5:302021-01-05T10:27:47+5:30

एका तरुणाने प्रेयसीला गोळी मारून तिची हत्या करत नंतर स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली.

A youth shot dead a woman, around 22 years old, before shooting himself in Malad yesterday. | 'तो स्वत: मुलीला गाडीवरुन घेऊन आला होता'; मालाडमधील घटनेबाबत पालकमंत्र्यांची माहिती

'तो स्वत: मुलीला गाडीवरुन घेऊन आला होता'; मालाडमधील घटनेबाबत पालकमंत्र्यांची माहिती

मुंबई: एका तरुणाने प्रेयसीला गोळी मारून तिची हत्या करत नंतर स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. गोरेगावच्या बांगुरनगर परिसरात असलेल्या इन्फिनिटी मॉलच्या मागे हा प्रकार सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडला. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

प्रत्यक्षदर्शींने सांगितलेल्या माहितीनूसार, इन्फिनिटी मॉलच्या मागील बाजूस गोरेगाव लिंक रोडच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर ही घटना घडली. अचानक दोघांमध्ये वाद झाला व त्यातूनच सदर तरुणाने तरुणीवर गोळी झाडली व नंतर स्वत:वरही गोळी झाडून घेतली, असे सांगण्यात येत आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. 

संबंधित तरुणाने हे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी दोघांमध्ये पूर्वी प्रेमसंबंध होते, अशी माहिती पुढे येत आहे. तसेच मुलीचा दुसऱ्या मुलासोबत साखरपुडा देखील झाला होता. त्याप्रमाणे या घटनेच्याआधी तरुणाने त्या मुलीला आपल्या गाडीवर बसवून कांदिवली भागातून मालाड भागात घेवून आला होता. अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी दिली आहे. 

दरम्यान, संबंधित तरुण कांदिवली लालजीपाडा भागात राहाणारा होता व त्याच्यावर खंडणी व दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत, या माहितीला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. बांगुरनगर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. 
 

Read in English

Web Title: A youth shot dead a woman, around 22 years old, before shooting himself in Malad yesterday.