अज्ञात मारेकऱ्याकडून गोळी झाडून युवकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 10:42 IST2022-08-10T10:42:14+5:302022-08-10T10:42:27+5:30

नक्षलवादी सहसा घरून अपहरण करून जंगलात घेऊन जातात. ज्या गोष्टीबद्दल शंका आहे त्याबाबत विचारपूस करतात.

Youth shot dead by unknown assailant in Bhamaragad gadchiroli | अज्ञात मारेकऱ्याकडून गोळी झाडून युवकाची हत्या

अज्ञात मारेकऱ्याकडून गोळी झाडून युवकाची हत्या

भामरागड (गडचिरोली) : भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे किशोर कुडयामी या २३ वर्षीय युवकाची त्याच्या घरी भरणार बंदुकीने गोळी झाडून हत्या करण्याची घटना रात्री घडली. 

किशोरची बहीण रात्री लघुशंकेसाठी घराबाहेर आली असताना तिला अंधारात कोणी बंदूक घेऊन बाहेर असल्याचे दिसले. तिने भाऊ किशोर याला सांगितले. बाहेर जाऊ नको असेही तिने बजावले. पण किशोर कोण आहे म्हणून पाहण्यासाठी टॉर्च घेऊन घराबाहेर आला असता बाहेर उभ्या असलेल्या इसमाने त्याच्यावर गोळी झाडली. ही गोळी छातीत घुसून किशोरचा जागीच मृत्यू झाला. हा मारेकरी कोण हे शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे. 

नक्षलवादी सहसा घरून अपहरण करून जंगलात घेऊन जातात. ज्या गोष्टीबद्दल शंका आहे त्याबाबत विचारपूस करतात. शंका पक्की असल्याची खात्री पटल्यावर हत्या करतात. पण या प्रकरणात असे झाले नसल्याने ते मारेकरी कोण आणि कशासाठी त्याला मारले हे रहस्य कायम आहे.

Web Title: Youth shot dead by unknown assailant in Bhamaragad gadchiroli