तीन वर्षीय चिमुकलीवर २४ वर्षीय नराधमाचा अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 08:31 PM2020-07-24T20:31:40+5:302020-07-24T20:32:00+5:30

अत्याचारानंतर विकृत मनोवृत्तीच्या नराधमाने तिला घटनास्थळी फाशी देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Youth Rape three year old girl in Nandura | तीन वर्षीय चिमुकलीवर २४ वर्षीय नराधमाचा अत्याचार

तीन वर्षीय चिमुकलीवर २४ वर्षीय नराधमाचा अत्याचार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: अंगणात खेळत असलेल्या एका तीन वर्षीय चिमुकलीला ओसाड जागेवर नेऊन अत्याचार करण्यात आला. अत्याचारानंतर विकृत मनोवृत्तीच्या नराधमाने तिला घटनास्थळी फाशी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, मुलीचा आरडाओरडा ऐकूण पशुचिकित्सालयातील एक जण धावून गेला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकारामुळे नांदुरा येथे प्रचंड खळबळ उडाली आहे.
नांदुरा येथील एका वस्तीतील तीन वर्षीय चिमुकली अंगणात खेळत होती. त्यावेळी तिच्या घरच्यांची नजर चुकवून एका २४ वर्षी नराधमाने तिला उचलून नेले. नांदुरा येथील पशुचिकित्सालयाच्या जागेत चिमुकलीवर अत्याचार केल्यानंतर नराधमाने तिला फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मुलीने आरडाओरडा केल्याने पशुचिकित्सालयातील एक जण घटनास्थळी धावत गेला. आपल्याकडे एक जण धावत येत असल्याचे पाहताच नराधमाने घटनास्थळावरून पळ काढला. पशुवैद्यकीय रूग्णालयातील इसमाने साथीदारांच्या मदतीने घटनास्थळावरून चिमुकलीला  नांदुरा येथील रूग्णालयात नेले. तेवढ्यात घटनेची माहिती तिचे मामा आणि वडीलांना मिळाली. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी रूग्णालयात धाव घेतली. नराधमाच्या अत्याचारामुळे प्रकृती अत्यवस्थ झाल्याने चिमुकलीला खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात आणण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नांदुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रकीया सुरू आहे. 

 
नांदुरा येथील एका चिमुकलीवर नराधमाने अत्याचार केला. तिला जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला. आरोपीला अटक करण्यात आली असून  याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
-अनिल पाटील
ठाणेदार,  नांदुरा

Web Title: Youth Rape three year old girl in Nandura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.