जालन्यात जुन्या वादातून तरुणाचा खून; चाकून केला होता हल्ला

By दिपक ढोले  | Published: July 29, 2023 11:45 PM2023-07-29T23:45:55+5:302023-07-29T23:46:12+5:30

शनिवार रात्रीची घटना, एका संशयिताचा पोलिसांना ताब्यात घेतल्याची माहिती

Youth killed over old dispute in Jalna; The attack was done with a knife | जालन्यात जुन्या वादातून तरुणाचा खून; चाकून केला होता हल्ला

जालन्यात जुन्या वादातून तरुणाचा खून; चाकून केला होता हल्ला

googlenewsNext

दीपक ढोले, जालना: जुन्या जालन्यातील फुकटनगर भागात एकाचा जुन्या वादातून खून झाल्याची घटना शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. आझादसिंग इच्छासिंग तीलपितया (२८ रा.रामनगर), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक ज्ञानदेव नांगरे यांनी दिली.

जुन्या वादाच्या कारणावरून काही संशयितांनी फुकटनगर भागात आझादसिंग याच्यावर चाकून हल्ला केला. त्यात आझादसिंग गंभीर जखमी झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, कदीम ठाण्याचे पोलिस निरीक्षक सिध्दार्थ माने, उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी जखमी अजाजसिंग यास तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हल्ला करणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Youth killed over old dispute in Jalna; The attack was done with a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.