जेवणाच्या वादातून चेंबूरमध्ये तरुणाची हत्या, दोघांना ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 19:41 IST2023-10-09T19:41:46+5:302023-10-09T19:41:54+5:30

याबाबत चेंबूर पोलिसांनी गुन्हा नोंदवत, दोघांना बेड्या ठोकल्या आहे.

Youth killed in Chembur over food dispute | जेवणाच्या वादातून चेंबूरमध्ये तरुणाची हत्या, दोघांना ठोकल्या बेड्या

जेवणाच्या वादातून चेंबूरमध्ये तरुणाची हत्या, दोघांना ठोकल्या बेड्या

मुंबई : चेंबूरमध्ये जेवण घेण्यावरून झालेल्या वादात दोघांनी एका २२ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करत, त्याची हत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. याबाबत चेंबूर पोलिसांनी गुन्हा नोंदवत, दोघांना बेड्या ठोकल्या आहे.

चेंबूरच्या अशोक नगर परिसरात राहणाऱ्या अनिल रणदिवे या तरुणाचा यामध्ये मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री चेंबूर कॉलनी परिसरात असलेल्या सनिधी या बारमधून तो काही खाद्य पदार्थ आणण्यासाठी गेला होता. यावेळी याठिकाणी अन्य दोघेजण खाद्यपदार्थ घेण्यासाठी उभे होते. या तिघांमध्ये पहिले पार्सल कोण घेणार यावरून वाद झाला. काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

यावेळी रितीक बजाज (२३) आणि हर्षद वलोड्रा (२७) या दोघांनी अनिल याला मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत चेंबूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत दोघांना अटक केली आहे. 

Web Title: Youth killed in Chembur over food dispute