शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पार्टी बेतली जीवावर; ग्रामपंचायत निवडणुकीचा वादातून युवकाची हत्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 16:34 IST

Murder : तो पार्टीत पोहोचल्यानंतर जेवण करीत असताना समोरच बसलेल्या विश्वास संदीप गव्हाणे याने कोंडबाशी तू आम्हाला मतदान केले नाही, तु जेवायला कसा आला यावरून वाद घातला. 

ठळक मुद्देकोंडबा लक्ष्मण हटकर (३४) रा. राहटी असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

दिग्रस (यवतमाळ) : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीनंतर आयाेजित एका पार्टीत युवकाचा खून करण्यात आला. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद जीवघेणा ठरल्याचे स्पष्ट झाले. 

कोंडबा लक्ष्मण हटकर (३४) रा. राहटी असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास त्याला गंभीर जखमी अवस्थेत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली होती. दरम्यान, बुधवारी राहटी येथे मतमोजणीनंतर नारायण गव्हाणे यांचा विजय झाल्याबद्दल एका शेतात पार्टी आयोजित केली होती. त्या पार्टीला जातो असे सांगून कोंडबा दुपारीच घरुन निघून गेला. तो पार्टीत पोहोचल्यानंतर जेवण करीत असताना समोरच बसलेल्या विश्वास संदीप गव्हाणे याने कोंडबाशी तू आम्हाला मतदान केले नाही, तु जेवायला कसा आला यावरून वाद घातला. 

दोघात वाद सुरू असतानाच विश्वासने कोंडबाच्या छातीवर सुरा फेकून मारला. यात कोंडबा रक्तबंबाळ होऊन कोसळला. त्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात नेले होते. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, गुरुवारी कोंडबाची पत्नी संगीता, भाऊ भीका यांनी पोलीस ठाणे गाठून कोंडबाचा खून झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तत्पूर्वी बुधवारी रात्रीच विश्वास गव्हाणे याला ताब्यात घेऊन भादंवि ३०२, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला. गुरुवारी सकाळपासून कोंडबाच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात ठिय्या देत सर्व आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेहाची उत्तरीय तपासणी करू देणार नाही, अशी भूमिका घेतली. यावेळी राहटी येथील काही महिला व पुरुषांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. या घटनेने काही काळ तणाव निर्माण झाला होता. यवतमाळहून पोलीस कुमक बोलाविलीकोंडबाच्या कुटुंबीयांनी दिग्रस पोलीस ठाण्यात ठिय्या दिल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी यवतमाळ येथून राखीव पोलीस दलाला पाचारण केले होते. तोपर्यंत उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल शहरात दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनात सोनाजी आमले पुढील तपास करीत आहे. दरम्यान गुरुवारी दुपारनंतर कोंडबाच्या नातेवाईकांनी उत्तरीय तपासणीस सहमती दिली. पोलिसांनी या प्रकरणात तपासाअंती जादा आरोपी आढळल्यास गुन्हा दाखल करण्याची ग्वाही दिली.

टॅग्स :MurderखूनYavatmalयवतमाळgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकPoliceपोलिस