उल्हासनगरात तरुणाचे पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवून अपहरण, १० लाखांच्या खंडणीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 18:23 IST2020-08-23T18:22:13+5:302020-08-23T18:23:14+5:30

उल्हासनगर कॅम्प नं-५ भाटिया चौकातून श्यामलाल अनवाणी -३६ शुक्रवारी साडे दहा वाजता जात होते. त्यावेळी अज्ञात इसमानी पिस्तुल व चाकूचा दाखवून रिक्षात बसून अपहरण करूंन मारहाण केली.

Youth kidnapped in Ulhasnagar at gunpoint, demanding Rs 10 lakh ransom | उल्हासनगरात तरुणाचे पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवून अपहरण, १० लाखांच्या खंडणीची मागणी

उल्हासनगरात तरुणाचे पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवून अपहरण, १० लाखांच्या खंडणीची मागणी

उल्हासनगर - कॅम्प नं -५ भाटिया चौकातून शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता श्यापलाल अनवाणी यांचे रिक्षातून पिस्तुल व चाकूचा धाक दाखवून अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी त्यांच्या वडीलांना फोन करून १० लाखाची खंडणी मागितली असून सायंकाळी साडे पाच वाजता पाले गाव डी मार्ट येथे फेकून दिले. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 उल्हासनगर कॅम्प नं-५ भाटिया चौकातून श्यामलाल अनवाणी -३६ शुक्रवारी साडे दहा वाजता जात होते. त्यावेळी अज्ञात इसमानी पिस्तुल व चाकूचा दाखवून रिक्षात बसून अपहरण करूंन मारहाण केली. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी श्यामलाल अनवाणी यांच्या वडीलांना फोन करून १० लाखाची खंडणी मागितली. अखेर खंडणी न दिल्याने अनवाणी यांना सायंकाळी पालेगाव येथील डी मार्ट येथे रिक्षातून टाकून देण्यात आले. त्यांनी हिललाईन पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना कथन केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटिव्ही कॅमेरे आधारे अपहरणकर्त्यांना शोध पोलिस घेत आहेत.

Web Title: Youth kidnapped in Ulhasnagar at gunpoint, demanding Rs 10 lakh ransom