धक्कादायक! मित्र रंग लावतील म्हणून इमारतीवर चढला आणि जीवाला मुकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 23:19 IST2022-03-18T23:17:14+5:302022-03-18T23:19:27+5:30

मित्र रंग लावतील या भीतीने २६ वर्षाचा तरुण अविनाश पाटील एका इमारतीवर चढला आणि याच इमारतीवरून खाली पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना

youth died from building while celebrating holi in ambarnath | धक्कादायक! मित्र रंग लावतील म्हणून इमारतीवर चढला आणि जीवाला मुकला

धक्कादायक! मित्र रंग लावतील म्हणून इमारतीवर चढला आणि जीवाला मुकला

अंबरनाथ : मित्र रंग लावतील या भीतीने २६ वर्षाचा तरुण अविनाश पाटील एका इमारतीवर चढला आणि याच इमारतीवरून खाली पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना धुळवडीच्या दिवशी दुपारी अंबरनाथ च्या पूर्व भागात घडली आहे. 

अंबरनाथ पूर्व भागातील शिवाजीनगर परिसरात राहणारा अविनाश पाटील (२६ ) हा शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आपल्या लहान भावा सोबत शिवाजीनगर पोलीस स्टेशन समोरील एका नवीन इमारतीखाली उभा होता. मात्र यावेळी धुलीवंदन निमित्त त्याचे काही मित्र अविनाश आणि त्याच्या लहान भावाला रंग लावण्यासाठी आले होते. 

रंग लावण्याच्या भीतीने अविनाश आणि त्याचा भाऊ समोरील इमारतीमध्ये पळाले. यावेळी अविनाशचा लहान भाऊ हा पहिल्या मजल्यावरच थांबला तेव्हा त्याच्या मित्राने त्यांना रंग लावत इमारतीखाली आणले. याचवेळी अचानक इमारतीच्या गच्चीवरून अविनाश पाटील जमिनीवर पडल्याचा जोरदार आवाज झाल्याचे अविनाशच्या भावाने सांगितल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे. मात्र अविनाशचा तोल कसा गेला, यावेळी इमारतीवर आणखी कोणी होते का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेनंतर अविनाश याचा मृतदेह उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

Web Title: youth died from building while celebrating holi in ambarnath