अंगावर पेट्रोल ओतून तरुणाची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 21:34 IST2019-05-24T21:30:23+5:302019-05-24T21:34:06+5:30

शेंदोळा खुर्द येथील घटना; थरार मोबाईलमध्ये कैद

Youth committed suicide | अंगावर पेट्रोल ओतून तरुणाची आत्महत्या 

अंगावर पेट्रोल ओतून तरुणाची आत्महत्या 

ठळक मुद्देशुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली.सतीश नारायण सावरकर (२८, रा. शेंदोळा खुर्द) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.

तिवसा (अमरावती) : तालुक्यातील आदर्श दत्तक गाव शेंदोळा खुर्द येथे एका २८ वर्षीय युवकाने अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली.
सतीश नारायण सावरकर (२८, रा. शेंदोळा खुर्द) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मोलमजुरी करीत होता. सहा महिन्यांपूर्वी याच परिसरातील एका तरुणानेही अशाच प्रकारे पेट्रोल ओतून आत्महत्या केली होती. सतीशला दारूचे व्यसन होते. तो शुक्रवारी सकाळपासूनच पेट्रोल ओतून आत्महत्या करणार असल्याचे सांगत सुटला. आपण सायंकाळी ७ वाजता गावातील राष्ट्रीय महामार्गाखालील बोगद्याजवळ आत्महत्या करू, असे त्याने गावातील काही जणांना सांगितल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले.  दारूचे व्यसन असल्याने सतीश हा नेहमीच मनोरुग्णासारखा वागायचा. त्याने गावातील पुलाच्या बोगद्याजवळ स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतले आणि पेटवून घेतले.  काही मिनिटांत त्याचा जागीच कोळसा झाला. तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत तिवसा पोलिसांनी तपास आरंभला आहे.

Web Title: Youth committed suicide