अभियांत्रिकीच्या विद्यार्थीनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल; दिली होती अशी धमकी
By अझहर शेख | Updated: March 25, 2023 17:36 IST2023-03-25T17:36:05+5:302023-03-25T17:36:15+5:30
संशयित अजित लाळगे याने तिला तिचे फोटो साेशलमिडियावर टाकण्याची धमकी दिली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थीनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल; दिली होती अशी धमकी
नाशिक : आडगाव शिवारातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या २२वर्षीय विद्यार्थिनीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी सांगलीच्या एका संशयित युवकाविरुद्ध आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित अजित लाळगे याने तिला तिचे फोटो साेशलमिडियावर टाकण्याची धमकी दिली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.
निफाड तालुक्यातील रहिवासी असलेले मयत मुलीचे वडील राजाराम पोपट फापाळे यांनी आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून सांगली जिल्ह्यातील तासगाव सांगोला येथे राहणारा संशयित युवक अजित लाळगे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.
तीन आठवड्यापूर्वी आडगाव शिवारातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या कल्याणी राजाराम फापाळे हिने आडगाव शिवारात असलेल्या म्हाडा इमारतीमधील राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या कल्याणीला संशयित अजित हा दारू पिऊन तिचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची वारंवार धमकी देत होता.
ने त्या धमकीला घाबरून कल्याणी हिने आत्महत्या केली होती, असे तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केल आहे.