वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेला युवकाचा धरणात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 19:30 IST2021-06-13T19:29:28+5:302021-06-13T19:30:00+5:30
Drowning Case : मृतक अंकित हा एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पंचधारा धरणावर आला होता, सोबत केक सुद्धा आणला होता.

वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेला युवकाचा धरणात बुडून मृत्यू
वर्धा : मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या एका युवकाचा रिधोरा येथील पंचधारा धरणात बुडून मृत्यू झाला , ही घटना रविवार सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडली. मृतक युवकाचे नाव अंकित जितेंद्र टेभुर्णे (२१) रा. सेवाग्राम असे आहे.
मृतक अंकित हा एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पंचधारा धरणावर आला होता, सोबत केक सुद्धा आणला होता.
काही मित्र यायचे असल्याने अंकितला पोहण्याचा मोह झाला आणि त्यांनी धरणात उडी घेतली. परंतु धरणाच्या खोलीचा अंदाज नसल्याने तो खोल पाण्यात गेला , मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही शेवटी पाण्यात गटांगळ्या खाऊन धरणात अंकितचा मृत्यू झाला.अंकित हा एकुलता एक असून दोन बहिणी आहेत तर वडील जिल्ह्याधिकारी कार्यालयात नोकरीवर आहेत.घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीसांच्या चमूनी घटना स्थळाला भेट देत पंचनामा केला व प्रेत शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतले.
लग्नाच्या बहाण्याने मंदिरात नेले; प्रेयसीवर बलात्कार करून जंगलात सोडून पोलीस कर्मचारी पळाला https://t.co/zbB7fvn3X5
— Lokmat (@MiLOKMAT) June 13, 2021