"पत्नीचे इतर तरुणांसोबत शारीरिक संबंध", व्हिडीओद्वारे आरोप करून पतीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 02:21 PM2021-10-20T14:21:32+5:302021-10-20T14:22:02+5:30

Crime News : ऋषभच्या कुटुंबीयांनी त्यांची पत्नी आणि सासूवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Young Man Suicide Made Video Alleged Wife And Mother In Law At Auraiya In Uttar Pradesh | "पत्नीचे इतर तरुणांसोबत शारीरिक संबंध", व्हिडीओद्वारे आरोप करून पतीची आत्महत्या

"पत्नीचे इतर तरुणांसोबत शारीरिक संबंध", व्हिडीओद्वारे आरोप करून पतीची आत्महत्या

Next

उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका तरुणाने आत्महत्येपूर्वी आपला व्हिडिओ तयार केला. या व्हिडीओत त्यांने जे काही म्हटले होते, ते अतिशय धक्कादायक आहे. औरैया जिल्ह्यातील ब्राह्मणनगरमध्ये 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी, एक व्हिडिओ बनवला. या व्हिडीओमध्ये त्याने आपल्या पत्नी आणि सासूने त्रास असून पैसे घेतल्याचे म्हटले. तसेच पत्नीचे इतर तरुणांसोबत शारीरिक संबंध असल्याचेही म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Young Man Suicide Made Video Alleged Wife And Mother In Law At Auraiya In Uttar Pradesh)

दरम्यान, 24 वर्षीय तरुणाचे ऋषभ असे नाव असून त्याचे 2020 मध्ये औरैया कोतवाली परिसरात लग्न झाले होते. ऋषभने गळफास लावून आत्महत्या केली. पण त्याआधी त्याने मोबाईलवरून एक व्हिडिओ बनवला. त्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला, "पत्नीचे इतर तरुणांसोबत शारीरिक संबंध आहेत. ती मला अपमानित करण्यासाठी असे करते. सासूनेही दोनदा लग्न केले आणि दोन्ही पतींना मारले. त्या सिगारेट ओढतात आणि दारू पितात. पैशासाठी मला त्रास दिला. त्यांच्यामुळे माझ्यावर 7 लाख रुपयांचे कर्ज झाले. त्यामुळे असे इतर कोणासोबतही होऊ नये, म्हणून मी एक व्हिडिओ बनवत आहे."

हा व्हिडीओ तयार केल्यानंतर ऋषभने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबतची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. त्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. ऋषभच्या कुटुंबीयांनी त्यांची पत्नी आणि सासूवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कारवाई केली नाही, असा आरोप ऋषभच्या कुटुंबीयांनी केला आहे. शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेतून मृतदेह घेऊन कोतवाली औरैया गाठले आणि कारवाईची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. 

Web Title: Young Man Suicide Made Video Alleged Wife And Mother In Law At Auraiya In Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app