बाईकवरून जाणाऱ्या तरुणाची मान अडकली मांज्यात; जागीच झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 15:48 IST2021-06-20T15:45:41+5:302021-06-20T15:48:46+5:30
Death Case : युवकाच्या गळ्यात पतंगाचा मांजा अडकला, त्यामुळे त्याची अर्धी मान कापली गेली आणि तो वेगवान मोटरसायकलवरून खाली पडला.

बाईकवरून जाणाऱ्या तरुणाची मान अडकली मांज्यात; जागीच झाला मृत्यू
लखनौमधील बहराइचमध्ये मोहम्मदा ओव्हर ब्रिजवर मोटरसायकलवरून जाणाऱ्या युवकाच्या गळ्यात पतंगाचा मांजा अडकला, त्यामुळे त्याची अर्धी मान कापली गेली आणि तो वेगवान मोटरसायकलवरून खाली पडला.
या अपघातात दीपक यादव (वय 24) याचा मृत्यू झाला. विजय बहादुर यादव यांचा मुलगा असून तो भगतापूर येथे राहत होत. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चौकी प्रभारी एसआय इंद्रजीत यादव हे हमराही दिवाकर यांच्यासमवेत पोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठविला.
असे सांगितले जात आहे की, मृत युवक दीपक यादव मोटर सायकलवरून बहराइचला जात होता. पत्राच्या चिनी मांजा गळ्यात अडकल्याने मोहम्मदा नाल्यावरील ओव्हर ब्रिजजवळ पोहोचताच अर्धी मान कापली. यामुळे तो तरुण खाली पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला.