प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या, गुप्तांगही कापले; त्यानंतर मृताच्या संतप्त कुटुंबीयांनी उचललं टोकाचं पाऊल आणि मग… 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 09:30 AM2021-07-25T09:30:11+5:302021-07-25T09:31:02+5:30

Crime News: २२ वर्षांच्या सौरभ कुमार हा तरुण तिथे त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता. तेव्हा या तरुणाला सदर प्रेयसीच्या कुटुंबीयांनी पाहिले आणि त्यानंतर त्याची हत्या केली.

Young man murdered in love affair, angry family cremated in front of his girlfriend's house | प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या, गुप्तांगही कापले; त्यानंतर मृताच्या संतप्त कुटुंबीयांनी उचललं टोकाचं पाऊल आणि मग… 

प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या, गुप्तांगही कापले; त्यानंतर मृताच्या संतप्त कुटुंबीयांनी उचललं टोकाचं पाऊल आणि मग… 

Next

पाटणा - बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एका तरुणाच्या हत्येनंतर परिसरातील वातावरण तापले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रामपूर गावातील रहिवासी असलेल्या २२ वर्षांच्या सौरभ कुमारची शेजारच्या सोनरबरसा गावात हत्या करण्यात आली. हा तरुण तिथे त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता. तेव्हा या तरुणाला सदर प्रेयसीच्या कुटुंबीयांनी पाहिले आणि त्यानंतर त्याची हत्या केली. या तरुणीच्या कुटुंबीयांनी सौरभला बेदम मारहाण केली. तसेच त्याचा प्रायवेट पार्टसुद्धा कापून टाकला, असा आरोप करण्यात येत आहे.(Young man murdered in love affair, angry family cremated in front of his girlfriend's house)

सौरभच्या कुटुंबीयांना त्याला करण्यात आलेल्या मारहाणीबाबत नंतर सांगण्यात आले. त्यानंतर संतप्त झालेल्या सौरभच्या कुटुंबीयांनी त्याच्या पार्थिवावर प्रेयसीच्या घरासमोरच अंत्यसंस्कार केले. दरम्यान, मृतदेहाचे दहन करण्यात आल्यानंतर पोलिसांना दोन्हीकडच्या लोकांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २३ जुलै रोजी सौरभ हा प्रेयसीला भेटण्यासाठी शेजारील गाव असलेल्या सोनरबरसा येथे गेला होता. त्यावेळी या दोघांनाही बोलताना मुलीच्या कुटुंबीयांनी पाहिले. त्यानंतर सौरभला मारहाण करण्यात आली. तसेच या मारहाणीत सौरभ गंभीररीत्या जखमी झाला. त्या परिस्थितीत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच सौरभच्या कुटुंबीयांनाही याची माहिती देण्यात आली. मात्र उपचारांदरम्यान, सौरभचा मृत्यू झाला. तर त्याला मारहाण करणारे प्रेयसीचे कुटुंबीय फरार झाले.

दरम्यान, संतप्त झालेल्या सौरभच्या कुटुंबीयांनी सदर मुलीच्या घरासमोरच सौरभच्या मृतदेहावतर अंत्यसंस्कार केले. हा प्रकार रोखण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत चिता पेटली होती.  त्यामुळे पोलिसांनी मुलाच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले. मात्र या प्रकारामुळे परिसरातील लोकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.  

Web Title: Young man murdered in love affair, angry family cremated in front of his girlfriend's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app