रायगडमधील धक्कादायक घटना, विष पिऊन तरुणाने इमारतीवरुन मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 05:22 PM2020-06-17T17:22:19+5:302020-06-17T17:34:32+5:30

बुधवारी रात्री या इमारतीवरून योगेश गुडेकर याने विषारी औषध घेउन या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

The young man ended his life by jumping from the building after consuming poison | रायगडमधील धक्कादायक घटना, विष पिऊन तरुणाने इमारतीवरुन मारली उडी

रायगडमधील धक्कादायक घटना, विष पिऊन तरुणाने इमारतीवरुन मारली उडी

Next
ठळक मुद्दे योगेश अनंत गुडेकर (वय 32, रा. गोरेगांव) असे या आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी गोरेगांव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नेांद करण्यात आली आहे.

गिरीश गाेरेगावकर

माणगाव - नव्याने काम सुरू असलेल्या इमारतीवरून उडी मारून एका 32 वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी माणगाव येथे घडली. योगेश अनंत गुडेकर (वय 32, रा. गोरेगांव) असे या आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट समजू शकले नाही. गोरेगांव येथील गोगा सेंटर शेजारी एका गृहसंकुलाचे नव्याने काम सुरू आहे. बुधवारी रात्री या इमारतीवरून योगेश गुडेकर याने विषारी औषध घेउन या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

आज सकाळी तेथे काम करित असलेल्या कामगारांनी योगेशचा मृतदेह पाहिल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती गोरेगांव पोलीस ठाण्यात दिली. माणगांव उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर योगेशचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी गोरेगांव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नेांद करण्यात आली आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश

 

भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक

 

बाप की नरपिशाच्च? लॉकडाऊनमध्ये पोटच्या मुलीवर बलात्कार करून द्यायचा गर्भपाताचे औषध

 

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येवर देशभरात चर्चा, SCनंही मानसिक आजाराबाबत केला सवाल

Web Title: The young man ended his life by jumping from the building after consuming poison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.