अल्पवयीन तरुणीला पळवणारा तरुण गजाआड; चार महिन्यांनी अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 20:20 IST2021-06-09T20:16:28+5:302021-06-09T20:20:18+5:30

Crime News : वक्ते हा मूळचा बीड जिल्हयातील राहणारा आहे. तो त्याच्या कल्याणमधील मावशीकडे शिक्षणासाठी आला होता.

A young man arrested for kidnapping a minor; Arrest after four months | अल्पवयीन तरुणीला पळवणारा तरुण गजाआड; चार महिन्यांनी अटक

अल्पवयीन तरुणीला पळवणारा तरुण गजाआड; चार महिन्यांनी अटक

ठळक मुद्दे प्रेम वक्ते (वय 20) असे अटक आरोपीचे नाव आहे.

कल्याण: पुर्वेकडील कोळसेवाडी परिसरातून एका अल्पवयीन 15 वर्षीय तरुणीला पळवून नेणा-या तरुणाला कोळसेवाडी पोलिसांनीअटक केली आहे. प्रेम वक्ते (वय 20) असे अटक आरोपीचे नाव आहे.


वक्ते हा मूळचा बीड जिल्हयातील राहणारा आहे. तो त्याच्या कल्याणमधील मावशीकडे शिक्षणासाठी आला होता. त्याचे मावशी राहत असलेल्या परिसरातील एका 15 वर्षीय मुलीसोबत प्रेम जडले होते. तो तिला घेऊन पळून गेला. मुलीच्या पालकांनी कोळसेवाडी पोलिस ठाणे गाठले. फेब्रुवारी महिन्यात मुलीला पळवून नेल्याप्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. परंतू पोलिस मुलीचा शोध घेण्यात कसूर करीत असल्याने मुलीच्या पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणात पोलिसांना आदेश दिले होते की, मुलाचा शोध येत्या 14 जूनच्या आत घ्या. पोलीसांचे विशेष पथक या तपासकामी गठीत करण्यात आले होते. पोलिस अधिकारी सुरेश डांबरे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाईल लोकेशन घेत आरोपी वक्तेला अटक करून तरूणीची सुटका केली आहे.

 

Web Title: A young man arrested for kidnapping a minor; Arrest after four months