शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास पश्चिम बंगालमधून युपी पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 20:47 IST

Yogi Adityanath : मिळालेल्या माहितीनुसार, यूपी पोलीस या आरोपीला घेऊन लखनौला गेले आहेत. या आरोपीने राणीगंजमधून योगी आदित्यनाथ यांना ट्विटरवर शिवीगाळ आणि धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे.

धनबाद -  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देशातील अशा काही नेत्यांपैकी एक आहेत जे दहशतवादी किंवा अराजक घटकांच्या निशाण्यावर आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना अनेकवेळा धमकावल्याच्या बातम्याही आल्या आहेत. याचप्रकरणी धनबादपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पश्चिम बंगालमधील राणीगंज येथून एकास अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यूपी पोलीस या आरोपीला घेऊन लखनौला गेले आहेत. या आरोपीने राणीगंजमधून योगी आदित्यनाथ यांना ट्विटरवर शिवीगाळ आणि धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे.या आरोपीचा शोध घेतल्यानंतर लखनौ पोलिसांनी धनबादला लागून असलेल्या पश्चिम बंगालमधील राणीगंज रेल्वे स्थानकाजवळून मोहम्मद नौशाद नावाच्या तरुणाला अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी नौशाद रस्त्यावर बसून किराणा सामान विकतो. अटकेनंतर पोलिसांनी त्याला आसनसोल न्यायालयात हजर केले, त्यानंतर यूपी पोलिसांनी त्याला ट्रान्झिट रिमांडवर लखनौला नेले. असे बोलले जात आहे की, आरोपी ट्विटर वापरतो, त्यामुळे यूपी पोलिसांना त्याच्याबद्दल मोठा कट रचत असल्याचं वाटत आहे.खरं तर, मोहम्मद नौशाद हा रस्त्याच्या कडेला राहणारा एक सामान्य फेरीवाला नसल्याचा लखनौ पोलिसांना संशय आहे. ट्विटर वापरल्यानंतर लखनौ पोलिसांना त्याच्यावर संशय आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूपी पोलीस अधिकार्‍यांनी राणीगंज पोलिस स्टेशनला सांगितले की, ५ नोव्हेंबर २०२१ रोजी आरोपीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्याच्या ट्विटर अकाउंटवरून जीवे मारण्याची धमकी दिली होती.हे प्रकरण गांभीर्याने घेत उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपीच्या ट्विटची चौकशी करण्यासाठी ट्विटर कंपनीशी संपर्क साधला. यानंतर ट्विटरने आरोपीला ओळखले. तेव्हापासून लखनौ पोलीस मोहम्मद नौशादच्या मोबाईल लोकेशनचा सतत शोध घेत होते. मात्र, नौशाद सतत ठावठिकाणा बदलत होता. त्यामुळे त्याला घेराव घालणे पोलिसांना शक्य झाले नाही. लखनौ पोलिसांना तो सतत राणीगंजमध्ये राहत असल्याचे आढळून आल्यावर छापा टाकण्यात आला. त्यानंतर मंगळवारी आसनसोल न्यायालयात हजर केल्यानंतर तिला ट्रान्झिट रिमांडवर लखनौला नेण्यात आले.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशwest bengalपश्चिम बंगालArrestअटकTwitterट्विटर