शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

Yes bank घोटाळ्याप्रकरणी राणा कपूरला जोरदार दणका; 2200 कोटींची संपत्ती जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 8:48 PM

येस बँकेचे राणा कपूर आणि त्यांच्या दोन मुलींची डमी कंपनी अर्बन बँक व्हेन्चर्स या घोटाळ्यांमधून ६०० कोटी रुपये मिळाले होते, याची ईडी चौकशी करीत आहे.

ठळक मुद्देराणा कपूर यांची कंबाला हिल येथील इमारत, नेपियन्सी रोडवरील ३ डुप्लेक्स, वरळी आणि मुंबई परिसरातील ८ फ्लॅट्स तसेच नवी दिल्लीतील अम्रित शेरगील मार्गावरील संपत्ती ईडीने जप्त केली आहे.  कपिल आणि धीरज वाधवान यांची मुंबईतील खारमधील १२ फ्लॅट्स, लंडनमधील २ फ्लॅट्, ऑस्ट्रेलियामधील संपत्ती, मुळशी आणि पुण्यातील जमिनी ५ आलिशान गाड्या ईडीने जप्त केली

मुंबई -  Yes Bank घोटाळा प्रकरणी अंमलबाजवणी संचालनालयाने (ED)  बँकेचे सहसंस्थापक आणि आरोपी राणा कपूर यांना कारवाईचा मोठा दणका दिला आहे. राणा कपूर आणि कुटुंबीयांच्या मालकीची तब्बल 2200 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. DHFL चे प्रमोटर कपिल आणि धीरज वाधवान यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या संपत्तीवरही टाच आणली आहे. राणा कपूर यांची कंबाला हिल येथील इमारत, नेपियन्सी रोडवरील ३ डुप्लेक्स, वरळी आणि मुंबई परिसरातील ८ फ्लॅट्स तसेच नवी दिल्लीतील अम्रित शेरगील मार्गावरील संपत्ती ईडीने जप्त केली आहे.  दुसऱ्या एका आर्थिक घोट्याळ्याच्या केसमध्ये वाधवान बंधू आधीच CBI च्या ताब्यात आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. कपिल आणि धीरज वाधवान यांची मुंबईतील खारमधील १२ फ्लॅट्स, लंडनमधील २ फ्लॅट्, ऑस्ट्रेलियामधील संपत्ती, मुळशी आणि पुण्यातील जमिनी ५ आलिशान गाड्या ईडीने जप्त केली असून ३४४ बँक अकाऊंटवर जप्ती आणली आहे. दरम्यान येस बँकेच्या राणा कपूरच्या मालकीची मुंबई, पुण्यासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि यूकेमध्ये असणारी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. येस बँकेचे राणा कपूर आणि त्यांच्या दोन मुलींची डमी कंपनी अर्बन बँक व्हेन्चर्स या घोटाळ्यांमधून ६०० कोटी रुपये मिळाले होते, याची ईडी चौकशी करीत आहे. ३०००० कोटींअधून अधिक रक्कम कर्ज म्हणून बेकायदेशीरपणे मंजूर केल्याचा राणा कपूर यांच्यावर आरोप आहे. २००४ मध्ये त्यांनी येस बँक स्थापन केली आणि २०१९ पर्यंत ते बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ होते. याच काळात पैशांची अफरातफर झाली आहे. येस बँकेनं DHFLला  ३७५० कोटी रुपये आणि DHFLच्या नियंत्रणाखाली असलेल्या आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना ७५० कोटींचे कर्ज दिलं.

 

 

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर

 

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य

 

किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ

 

मृत्यूचा सूड! बापरे, एका वृद्धानं महिलेचं शिर कापून पोलीस ठाण्यात घेऊन गेला अन् म्हणाला...

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयYes Bankयेस बँकfraudधोकेबाजीMumbaiमुंबई