वरळीतील धक्कादायक घटना; तरुणीकडे पाहून हस्तमैथुन करणाऱ्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 21:15 IST2019-04-27T21:13:13+5:302019-04-27T21:15:53+5:30
या दोघांना पोलिसांनी भा. दं. वि. ३५४(अ), ५०८, ३४ कलमांतर्गत विनयभंगाच्या गुन्हात अटक केली आहे.

वरळीतील धक्कादायक घटना; तरुणीकडे पाहून हस्तमैथुन करणाऱ्या दोघांना अटक
मुंबई - वरळी परिसरात तरुणीकडे पाहून अश्लील चाळे करणाऱ्या २ जणांना वरळी पोलिसांनीअटक केली आहे. सिंगोटवेल कंदरस्वामी देवेंद्र (२५), आनंद कालिप्पन देवेंद्र (३८) अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांना पोलिसांनी भा. दं. वि. ३५४(अ), ५०८, ३४ कलमांतर्गत विनयभंगाच्या गुन्हात अटक केली आहे.
मूळचे तामीळनाडूचे रहिवाशी असलेले हे दोनही आरोपी वरळी परिसरात कामाला आहेत. शुक्रवारी वरळी परिसरात कामाला असलेली २६ वर्षीय तरुणी सायंकाळी ५ च्या सुमारास कामावरून सुटून घरी निघाली होती. त्यावेळी तरुणी वरळीच्या लव्ह ग्रोव्ह पंपीग हाऊस येथून जात असताना. हे दोघे त्या ठिकाणी होते. नकळत त्या तरुणीची नजर कंदरस्वामीच्या दिशेनं गेली. कंदरस्वामीने डोळ्यानं तरुणीला आनंदकडे पाहण्यास खुणावलं. तरुणीनं आनंदकडं पाहिलं असता. आनंद हा तरुणीकडं पाहून हस्तमैथून करत होता.
घाबरलेली तरुणीनं जवळील पालिकेच्या पंप हाऊसच्या सुरक्षा कार्यालयाजवळ गेली. तेथून तिनं तिच्या त्याच परिसरात राहणाऱ्या मित्राला मदतीसाठी फोन करून बोलावून घेतलं. मित्र आल्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं दोघांना पकडून पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून पोलिसांची मदत मागितली. त्यानुसार वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना ताब्यात घेत विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक केली. हे दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.