शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

अलगीकरण कक्षातील कामगार निघाला चरस तस्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 1:34 AM

मीरा-भार्इंदर महापालिका । जूनपासून होता कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अलगीकरण कक्षात सुरक्षारक्षकाने बलात्कार केल्याची घटना घडलेली असतानाच आता मुंबई पोलिसांनी पकडलेला अमली पदार्थ विक्रेता हा पालिकेच्या याच अलगीकरण कक्षात सफाई कामगार म्हणून कामाला होता, असे उघड झाले आहे.मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने १५ सप्टेंबर रोजी भार्इंदर पूर्वेला गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलाजवळ पालिकेच्या अलगीकरण कक्षाबाहेर सापळा रचून अविनाश सिंह (२४) व श्रवण गुप्ता (३८) या दोघांना २ किलो चरससह अटक केली. हे दोघेही आरोपी नालासोपाराचे राहणारे आहेत. या आरोपींनी भार्इंदरच्या बलराम उर्फ बल्ली यादव (३३) याच्याकडून चरस घेतल्याचे पोलिसांना सांगितले होते. यादव हा नेपाळहून उत्तर प्रदेश, बिहारमार्गे चरस आणत असे. नवघर पोलिसांनी यादवची चौकशी केली असता अविनाश हा अलगीकरण कक्षात सफाई कामगार म्हणून काम करत होता. १२ सप्टेंबर रोजीच त्याला चरसचा पुरवठा केला होता, असे चौकशीत उघड झाले. दरम्यान, अविनाश हा सिटीझन अलाइट या ठेकेदाराकडे कर्मचारी असल्याचे उघड झाले. तो जूनपासून पालिकेच्या अलगीकरण कक्षात सफाई कामगार म्हणून काम करीत होता. मुंबई पोलिसांनी १५ सप्टेंबर रोजी त्याला पकडले त्या वेळी तो कामावर हजर होता. त्यानंतर मात्र तो कामावर आलेला नाही, असे अलगीकरण कक्षातून सूत्रांनी सांगितले. बल्लीने चरसचा साठा दिला तो अविनाश याने अलगीकरण कक्षातच ठेवला होता, असा संशय आहे. शिवाय याआधी त्याने चरसची तस्करी व विक्री केल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.पालिकेच्या या अलगीकरण कक्षात सैनिक सिक्युरिटी या ठेकेदाराच्या सुरक्षारक्षकाने अलगीकरण कक्षात ठेवलेल्या २० वर्षीय नवविवाहितेवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर विक्रम शेरे याला अटक करण्यात आली.एमडी ड्रग्स बाळगणारेदोघे जण गजाआड1ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या काशिमीरा युनिटने एमडी या अमली पदार्थांसह दोघांना मीरा रोडच्या नयानगर भागातून अटक केली आहे. पथक नयानगर परिसरात गस्त घालत असताना संशयावरून त्यांनी दोनतरु णांना ताब्यात घेतले.2त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे एमडी हे अमली पदार्थ आढळले. पोलिसांनी आसिफ अली अफजर शेख (२४) व तारीक सिद्दिकी (२२) या दोघांना अटक केली. आसिफकडे २५ ग्रॅम तर तारिककडे २० ग्रॅम एमडी ड्रग्स सापडले. आरोपींना ठाणे न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थ