Worker's death after falling from the fourth floor of a building | इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू
इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू

ठळक मुद्देहा अपघात विकासक आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. या आधीदेखील याच ठिकाणी २९ मार्च रोजी विजेच्या धक्क्याने एका कुत्र्याचा मृत्यू झाला होता.

मुंबई - कांदिवली येथे इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून राम साहू (३४) या मजुराचा मृत्यू झाला. कांदिवली पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

लालजीपाडा परिसरात अठरा माळ्यांची निमार्णाधीन इमारत आहे. रविवारी या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर साहू काम करत असताना तोल जाऊन खाली कोसळला. त्याला तातडीने स्थानिक शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. हा अपघात विकासक आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

या आधीदेखील याच ठिकाणी २९ मार्च रोजी विजेच्या धक्क्याने एका कुत्र्याचा मृत्यू झाला होता. त्यावेळी केलेल्या तक्रारीची दखल पोलीस आणि एसआरएच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही. त्यानंतर, पुन्हा याच ठिकाणी निमार्णाधीन इमारतीच्या खड्ड्यामध्ये पडून आदित्य सिंह या ७ वर्षीय मुलाचा जून महिन्यात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दरम्यान आम्ही या घटनेची नोंद केली असून याबाबत चौकशी सुरू आहे, अशी माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोंडकुले यांनी दिली.

Web Title: Worker's death after falling from the fourth floor of a building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.